News Flash

‘मोदींपेक्षा पवारांना दुष्काळ जास्त कळतो; मंदिर संस्थानची तिजोरी भक्तांसाठी वापरा’!

दुष्काळ हाताळणीत सर्वच सत्ताधारी अपयशी ठरले आहे

श्रीपाल सबनिसांची मुक्ताफळे

दुष्काळ हाताळणीत सर्वच सत्ताधारी अपयशी ठरले आहेत, असा आरोप करून शेतकऱ्यांच्या मुडद्यावर आपली राजकीय सिंहासने बांधू नका, असा इशारा मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी दिला.

तुळजापूर नगरपालिकेत सबनीस व त्यांची पत्नी ललिता यांचा नगराध्यक्षा अ‍ॅड. मंजूषा मगर यांनी सत्कार केला. मराठवाडा समन्वय समितीचे प्रकाश इंगोले, उपनगराध्यक्ष बाळासाहेब िशदे, नगरसेवक अमर हंगरगेकर, विनोद गंगणे, धनंजय गंगणे, विजय कंदले यांची उपस्थिती होती.

दुष्काळ व शेतीबाबत शरद पवारांचे ज्ञान पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा अधिक आहे, असे सांगून तुळजापुरात सुविधा मंदिर संस्थानच्या पशातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि भाविकांना सुविधा उपलब्ध करून देणे हे योग्य आहे, असे सबनीस म्हणाले.

पुण्यातील आदिशक्ती फाउंडेशनसारखी संस्था पाच हजार पिठाच्या गिरण्या आत्महत्याग्रस्त भागात वितरित करीत आहे. त्याप्रमाणे इतर स्वयंसेवी संस्था दुष्काळी भागातील जनतेला मदतीचा हात द्यावा. सरकारकडून ज्या योजनांच्या घोषणा होतात, त्या शेतकऱ्यांपर्यत पोहोचत नाहीत.

मराठवाडय़ात स्थिती तर अधिकच गंभीर आहे, अशी स्थिती राष्ट्रीय आपत्तीमध्ये समाविष्ट केली पाहिजे, असे सांगून संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात आपण शेती व शेतकऱ्यांबाबत जी चिंता मांडली, त्याचे दर्शन आजही होत आहे. हृदयाला पाझर फोडणाऱ्या गंभीर स्थितीतून शेतकऱ्यास बाहेर काढण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी सातव्या वेतन आयोगाचा पसा दुष्काळ निवारणास नोकरदारांनी स्वतहून दिला पाहिजे. कारण तीन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्याला शोभणाऱ्या नाहीत, सरकारनेही शेतकऱ्यांना दुखातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी करावी, असेही त्यांनी नमूद केले.

तुळजापूर विकास प्राधिकरणाअंतर्गत नियोजित मंजूर नाटय़गृहाचे काम लवकर पूर्ण करावे. जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मंदिर संस्थानच्या पशातून  विकासाला  हातभार  लावावा.

तसेच भक्तांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही सबनीस यांनी या वेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 2:33 am

Web Title: sharad pawar is understanding drought more than modi says shripal sabnis
Next Stories
1 साखरझोपेतच गावांवर आगीचे लोट
2 शेतमजुराचा मुलगा नासात शास्त्रज्ञ
3 जनहिताच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे – अनंत गीते
Just Now!
X