News Flash

शरद पवारांनी घेतली संजय राऊतांची भेट; अजित पवार, धनंजय मुंडेही उपस्थित

वाचा नक्की काय आहे कारण...

संजय राऊत, शरद पवार, अजित पवार धनंजय मुंडे (फोटो- ट्विटर)

राज्यात महाविकास आघाडी उभारण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे दोन नेते म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. हे दोघे सत्तास्थापनेआधी एकत्र भेटल्यावर त्यांच्या भेटीची चर्चा होणं स्वाभाविक होतंच. पण सत्तास्थापना झाल्यानंतरही पवार-राऊत यांची भेट कायमच लक्ष वेधून घेते. अशीच एक भेट आज संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर झाली. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे या तिघांनी भांडुप येथील निवासस्थानी जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर शनिवारी (५ डिसेंबर) संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांनी भांडुप येथील संजय राऊतांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. शरद पवारांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतरही दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीच्या काही दिग्गज नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि प्रकृतीची चौकशी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केल्यानंतर शरद पवार, अजित पवार आणि धनंजय मुंडे हे तिघे संजय राऊत यांच्या घरी गेल्याची माहिती देण्यात आली.

संजय राऊत यांच्यावर बुधवारी, २ डिसेंबरला लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. या शस्त्रक्रियेत त्यांच्या हृदयात दोन स्टेन टाकण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. खरे पाहता गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अँजिओप्लास्टीच्या वेळी एकूण तीन स्टेन टाकण्यात आले होते. यातील एक स्टेन खराब झाल्यामुळे आता पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 11:51 am

Web Title: sharad pawar meets sanjay raut along with ajit pawar dhananjay munde after angioplasty surgery maharashtra politics vjb 91
Next Stories
1 अभिनेते रवी पटवर्धन यांच्या निधनावर मुख्यमंत्री ठाकरेंनी व्यक्त केला शोक; म्हणाले,…
2 शरद पवारांचा मोदी सरकारला इशारा; म्हणाले,”…तर हे दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही”
3 ‘वस्ताद पाटील’ काळाच्या पडद्याआड, रवी पटवर्धन यांच निधन
Just Now!
X