News Flash

जयंत पाटलांच्या ‘मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं’वर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

एका मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांनी मनातील सुप्त इच्छा केली होती व्यक्त

फाइल फोटो (फोटो सौजन्य: पीटीआय)

राजकारण म्हटलं की महत्त्वकांक्षा आलीच. मग ती तालुक्याच्या राजकारणात सक्रीय असो वा राज्याच्या. अशीच एक महत्वकांशा नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही व्यक्त केली. पाटील यांनी एका मुलाखतीत “आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं,” असं म्हटलं होतं. यावरच आता  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

पाटील नक्की काय म्हणाले?

जयंत पाटील यांनी इस्लामपूरमध्ये एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची इच्छा बोलून दाखवली. जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का असा प्रश्न मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना पाटील यांनी,”आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रीपद आलेलं नाही. माझी इच्छा असणारच. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावंस वाटणारचं. पण, पक्ष म्हणजे शरद पवार हे जो निर्णय घेतील, तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा आहे. मला वाटतं सगळ्यानांच असेल. एवढा दीर्घकाळ काम करणाऱ्याला, माझ्या मतदारांनाही असू शकते. त्यामुळे माझी जबाबदारी माझे मतदार आहेत. इच्छा आहे, पण परिस्थिती, संख्या… आमची ५४ आहे. ५४ आमदार असताना मुख्यमंत्री होणं शक्य नाही. त्यासाठी पक्ष वाढला पाहिजे. संख्या वाढली पाहिजे. संख्या वाढली… पक्ष मोठा झाला, तर शरद पवार हे जो निर्णय घेतील तो,” असं उत्तर दिलं.

आणखी वाचा- आता नारायण राणेंना सुखानं झोप लागेल – शरद पवार यांचा टोला

पवार म्हणतात…

शरद पवार हे आज कोल्हापूरमध्ये असून त्यांनी येथे सर्वसामान्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्यासंदर्भातील जी इच्छा व्यक्त केली त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी, “त्यात काय झालं? त्यांना शुभेच्छा. उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावेसे वाटेल, कोणी तसे करणार का?” असा उलट प्रश्न पत्रकारांना विचारला. पवारांनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांना द्यायचा तो संदेश दिला.

आणखी वाचा- धनंजय मुंडे प्रकरण: मी आधीच सांगितलं होतं… शरद पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीच्या वाट्याला मुख्यमंत्री पद सध्या तरी शक्य नाही

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागली आहे. सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. आमदारांची संख्या सर्वाधिक असलेल्या शिवसेनेकडं मुख्यमंत्रीपद असून, राष्ट्रवादीच्या वाट्याला उपमुख्यमंत्री आलेलं आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांसाठी शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार असं सत्तावाटपावेळी ठरलेलं असल्यानं राष्ट्रवादीच्या वाट्याला मुख्यमंत्री पद येण्याची शक्यता कमीच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 11:31 am

Web Title: sharad pawar on jayant patil wish to become chief minister scsg 91
Next Stories
1 आता नारायण राणेंना सुखानं झोप लागेल – शरद पवार यांचा टोला
2 धनंजय मुंडे प्रकरण: मी आधीच सांगितलं होतं… शरद पवारांची प्रतिक्रिया
3 “बलात्काराची तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी तात्काळ कारवाई करा”
Just Now!
X