News Flash

मराठा आरक्षण कोर्टात कितपत टिकेल याबाबत शंका – शरद पवार

'राज्यात भाजपा सरकारकडून मराठा आरक्षण दिलं गेलं आहे. पण ते न्यायालयात किती टिकेल ?'

(संग्रहित छायाचित्र)

मराठा आरक्षण कोर्टात कितपत टिकेल अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. राज्यात भाजपा सरकारकडून मराठा आरक्षण दिलं गेलं आहे. पण ते न्यायालयात किती टिकेल ? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे. 102 व्या घटना दुरुस्तीतील तरतुदीचा अभ्यास करण्याची गरज आहे. या तरतुदीमधील मुद्दे सरकारने लक्षात घेतले नसावेत असं शरद पवार बोलले आहेत.

साताऱ्यातील पाटणमध्ये झालेल्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी गांधी कुटुंबाचं कौतुक केलं. ‘एवढा त्याग एका कुटुंबाने केला. इंदिरा गांधींच्या हत्या, राजीव गांधींच्या हत्या झाली. या दोन हत्या झाल्यानंतरही देशसेवेचं व्रत आम्ही चालू ठेवणार ही भूमिका घेऊन जर सोनिया गांधी किंवा राहुल गांधी आज काम करत असतील तर त्याच्याबद्दल अभिमान वाटतो’, असं शरद पवार यांनी म्हटलं.

गांधी कुटुंबाचं कौतुक करत असताना शरद पवारांनी मोदी सरकारवर टीका केली. तसंच राहुल गांधीच देशाचं नेतृत्व करण्यासाठी योग्य असल्याचंही ते यावेळी म्हणाले. दुसरीकडे बारामतीत बोलताना देशात पर्यायी आघाडी न करता राज्यपातळीवर आघाडी करणार असं

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 8:36 pm

Web Title: sharad pawar question on maratha reservation
Next Stories
1 हुडहुडी : राज्यात तीन दिवस थंडीची लाट
2 …तर डी. वाय. पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंबंधीचा आरोप गंभीर मानला असता : अजित पवार
3 मुस्लिम आरक्षणासाठी राजकीय व सामाजिक इच्छाशक्तीची गरज : विनायक मेटे
Just Now!
X