News Flash

अजित पवारांना झुकतं माप का?; महाराष्ट्राच्या मनातील प्रश्नाला शरद पवारांनी दिलं उत्तर

‘साठीचा गझल .. महाराष्ट्राचा’ हा वेबसंवाद उलगडली भूमिका

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शरद पवार यांची चर्चा नेहमीच राज्याच्या देशाच्या राजकारणात होत असते. राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा चर्चेत अडकलेला असताना अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर तीन दिवसात अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. या सगळ्यानंतर अजित पवारांना झुकतं माप का? असा प्रश्न राज्यातील बहुतांश नागरिकांच्या मनात उटमला होता. लोकसत्ता वेबसंवादामध्ये हा प्रश्न पुन्हा एकदा विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी आपली भूमिका मांडत उलगडा केला.

महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘साठीचा गझल .. महाराष्ट्राचा’ हा वेबसंवाद ‘लोकसत्ता’तर्फे शुक्रवारपासून सुरू झाला. या अभिनव उपक्रमाच्या पहिल्या भागात माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी राज्यात झालेल्या राजकीय घडामोडी, अजित पवारांनी घेतलेला राजकीय निर्णय आणि त्यानंतर पक्षानं पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची दिलेली संधी या संबंधानं प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी भूमिका मांडली.

“अजित पवारांना महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन २०-२५ वर्षे झालीआहेत. सुरूवातीच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनच काम केलं. पाठिशी विधानसभेतील बहुसंख्य सदस्यांचा पाठिंबा असतानाही असा काही विचार कधी त्यांनी केला नाही. उपमुख्यमंत्रीपदाची संधी असताना त्यांनी छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते-पाटील किंवा आर. आर. पाटील यांची नावं सुचवली. स्वतःला संधी असताना त्यांनी स्वतःचा विचार कधी केला नाही. फक्त एक चुकीचं पाऊल रागाच्या परिस्थिती त्यांनी टाकलं. आणि आताच्या गव्हर्नर साहेबांनी पहाटे उठून शपथ देण्याची तत्परता दाखवली. तितकं एक काम, पण तेही त्यांच्या लक्षात आल्यानंतर ४८ तासांत त्यांनी राजीनामा देऊन चूक सुधारली. त्यानंतर पक्षातील सदस्यांनी एकजीवानं काम करण्याचा आग्रह केला. त्यातून त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. अजित पवारांचं वैशिष्ट्ये म्हणजे कष्ट भयंकर करतात. सकाळी सात वाजता त्यांचं कार्यालय सुरू होतं. जास्तीत जास्त लोकांना भेटणं, प्रश्न सोडवणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. काही गोष्टी होतात. पण, जसजसा वय वाढतं, अनुभव वाढतं. तशा या गोष्टी कमी होत जातात,” असं शरद पवार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 12:40 pm

Web Title: sharad pawar reply about ajit pawar question bmh 90
Next Stories
1 नाशिक : कामगारांना घेऊन जाणारी दुसरी रेल्वे उत्तर प्रदेशकडं रवाना; प्रवाशांनी दिल्या ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा
2 गोंदियाला पोहोचण्यासाठी हैदराबादहून चालत पार केलं ४५० किमी अंतर, पण थकवा सहन झाला नाही आणि….
3 Video : पोलिसांवर हात उचलणाऱ्या समाजकंटकांना भर चौकात चोप द्या : नितीन नांदगावकर
Just Now!
X