06 August 2020

News Flash

‘या’ कारणासाठी लॉकडाउनमध्ये बाळासाहेबांची आठवण अधिक आली : शरद पवार

विशेष मुलाखतीमध्ये पवारांनी व्यक्त केल्या भावना

फाइल फोटो

करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये एका गोष्टीसाठी बाळासाहेबांची आठवण नक्की आली असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे पवार यांची मुलाखत घेतली, या मुलाखतीत लॉकडाउन, राजकारण, ठाकरे कुटुंब, महाविकास आघाडी यासारख्या अनेक विषयांवर पवारांनी भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी बाळासाहेबांची लॉकडाउनदरम्यान मला एका खास गोष्टीसाठी आठवण झाल्याचं मत मांडलं.

बाळासाहेबांची आठवण येते का? या राऊतांनी विचारलेल्या प्रश्नाचे पवारांनी होय असं उत्तर दिलं. “आपण सर्व पहिले दोन महिने अस्वस्थ घरात बसून होतो. माझ्यापेक्षा बाळासाहेबांच्या कामाची पद्धत तुम्हाला जास्त माहिती आहे. ते काही दिवस दिवस घराबाहेर पडायचे आणि व्यवस्त असायचे असं नाही. दिवस दिवस त्यांनी घरात घालवले आहेत. पण ते दिवस घालवताना त्या परिस्थितीला सहकाऱ्यांनाबरोबर घेऊन त्यांना प्रोत्साहित करुन संकटाला कसं तोंड द्यायचं हे बाळासाहेबांनी नक्कीच शिकवलं होतं. म्हणून या दोन महिन्यांमध्ये बाळासाहेबांची आठवण येते,” असं पवारांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

नक्की वाचा >> बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये ‘हा’ मोठा फरक आहे : शरद पवार

“आपण घराच्या तर बाहेर पडायचं नाही. पण ज्या गोष्टींच्या दिशेने आपल्याला जायचयं त्या दिशेने जाण्याच्या प्रवासाची आपण तयारी केली पाहिजे. ते बाळासाहेब करायचे आणि त्याची आठवण या कालावधीमध्ये मला अधिक झाली,” अशा शब्दांमध्ये पवारांनी बाळासाहेबांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

मुलाखतीमध्ये अनेक ठिकाणी पावरांनी बाळासाहेबांचा संदर्भ दिल्याचे पहायला मिळालं.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये बराच फरक असल्याचे मत व्यक्त केलं आहे. बाळासाहेब हे सत्तेमागील प्रमुख व्यक्तीमत्व होतं तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असून त्यांना प्रत्यक्ष कारभार चालवायचा असल्याचे हा फरक असणे स्वाभाविक असल्याचेही पवारांनी म्हटलं आहे. “मुख्यमंत्र्यांचा जो स्वभाव आहे त्यानुसार निर्णय ते घेतात. मात्र अंत्यंत सावकाश, काळजी घेऊन, हळूहळू, निर्यणाचे दुष्परिणाम होणार नाहीत याची खातरजमा करुन मगच ते निर्णय घेतात,” असं पवारांनी मुलाखतीमध्ये सांगितलं. मात्र त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सर्व निर्यणांना माझा पाठिंबा आहे असंही स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 9:56 am

Web Title: sharad pawar says i miss balasaheb thackeray during coronavirus lockdown scsg 91
Next Stories
1 १०५ जागा मिळूनही महाराष्ट्रात भाजपाची सत्ता का नाही? शरद पवार म्हणतात…
2 शरद पवार म्हणाले, शिवसेनेशी वैचारिक मतभेद पण…
3 बाळासाहेबांची विचारधारा, कामाची पद्धत भाजपाशी सुसंगत कधी वाटलीच नाही : शरद पवार
Just Now!
X