News Flash

शरद पवार, उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचा एकाच कारने प्रवास

साताऱ्यात राजघराण्यातील मनोमीलनाची चर्चा

फोटो- प्रमोद इंगळे सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सातारा येथे आले होते.शरद पवारांचे आगमन झाल्यानंतर ते कार्यक्रम स्थळी जाण्यास निघाले. त्यावेळी शरद पवार हे नेहमीचा शिरस्ता सोडून आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या गाडीतून निघाले व खा. उदयनराजे, आ. शशिकांत शिंदे यांना म्हणाले या बसा गाडीत. यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या कारचालकाला उतरविले आणि स्वतः कार चालवण्यास बसले. शिवेंद्रसिंहराजेंच्या बाजूला शरद पवार, मागे उदयनराजे आणि त्यांच्या बाजूला शशिकांत शिंदे अशा चार नेत्यांनी एकत्रित कार्यक्रम स्थळापर्यंत प्रवास केला.यामुळे शरद पवार आणि खासदार उदयनराजे भोसले यांचे संबंध पुन्हा अधोरेखित झाले .

या निमित्ताने शरद पवारांनी सुरु केलेल्या साताऱ्याच्या राजघराण्यातील मनोमिलनाचे स्पष्ट संकेत दिसून आले . सातारा नगरपालिका निवडणुकीत काडीमोड झालेले सातारच्या राजघराण्यातील मनोमिलन हे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा जुळल्याचे स्पष्ट होत आहे. आज शनिवार दि. २६ जानेवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सातारा येथील पोलीस परेड ग्राऊंडवर हेलिकॉप्टरने दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आगमन झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी . उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे, शशिकांत शिंदे हे लोकप्रतिनिधी उपस्थितीत होते. शरद पवारांचे आगमन झाल्यानंतर ते कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी निघाले. त्यावेळी शरद पवार हे नेहमीचा शिरस्ता सोडून आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या गाडीतून निघाले व
खा. उदयनराजे, आ. शशिकांत शिंदे यांना म्हणाले या बसा गाडीत. यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या गाडीच्या चालकाला उतरविले आणि स्वतः गाडी चालविण्यास बसले. शिवेंद्रसिंहराजे बाजूला शरद पवार, मागे उदयनराजे आणि त्यांच्या बाजूला शशिकांत शिंदे असे चार नेत्यांनी एकत्रित कार्यक्रम स्थळा पर्यंत प्रवास केला.

शरद पवार हे साताऱ्यातील एका हॉस्पिटलच्या उदघाटन कार्यक्रमला सातारा दौऱ्यावर आले होते. नगरपालिका निवडणुकीत राजघराण्यातील मनोमिलन तुटल्यानंतर या दोन्ही भावांमधील संघर्ष उफाळून आला होता. तो संघर्ष सातारच्या जनतेने आणि दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी अगदी जवळून अनुभवला आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून साताऱ्याच्या राजकारणातील वातावरण बदलून गेलेले दिसते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 7:49 pm

Web Title: sharad pawar udayanraje and shivendraraje traveled together in same car
Next Stories
1 ‘डोके शांत ठेवा’ उदयनराजेंना शरद पवारांचा सल्ला
2 ‘फेसबुक फ्रेंड’ने कल्याणच्या रहिवाश्याला अडीच कोटींना गंडवले
3 ‘महाराष्ट्र पेटवणार’, बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण जाहीर झाल्याने आव्हाडांचा संताप
Just Now!
X