News Flash

फडणवीस-राऊत बैठकीनंतर शरद पवारांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

वर्षा निवासस्थानी तासभर सुरू होती चर्चा

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यातील भेटीची चर्चा सुरू आहे. फडणवीस-राऊत यांच्यातील भेटीनंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेचे पक्षनेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा सुरू होती. राऊत-फडणवीस भेटीनंतर झालेल्या बैठकीमुळे नव्या चर्चेला विषय मिळाला आहे.

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यात काल (२६ सप्टेंबर) बैठक झाली. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेचे पेव फुटले होते. मात्र, संजय राऊत यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीबद्दल खुलासा केल्यानंतर चर्चेवर पडदा पडला होता.

दरम्यान, फडणवीस-राऊत भेटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. तब्बल तासभर ही बैठक चालली. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, फडणवीस-राऊत यांच्या भेटीनंतर ही बैठक झाल्यानं वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

२०१९मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा एकत्र लढले होते. मात्र, सत्ता वाटपावरून दोन्ही मित्रपक्षांमध्ये मतभेद झाले होते. दोन्ही पक्षात सत्ता वाटपाचं सूत्र जुळून आलं नाही. त्यामुळे शिवसेनेनं वेगळी वाट निवडली होती. शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत हात मिळवत सत्ता स्थापन केली होती. या राजकीय समीकरणात शरद पवार व संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 5:56 pm

Web Title: sharad pawar uddhav thackeray meeting devendra fadnavis sanjay raut maharashtra politics bmh 90
Next Stories
1 राज्यात २४ तासांत आणखी १६९ पोलीस करोनाबाधित, दोघांचा मृत्यू
2 …ही शिवसनेची मजबुरी आहे का?; भाजपा नेत्याचा संजय राऊत यांना सवाल
3 अमरावती : अंघोळीसाठी गेलेली तीन मुलं बुडाली, वाचवण्याच्या प्रयत्नात आईचाही अंत
Just Now!
X