News Flash

सुजय विखे पाटील यांचा बालहट्ट मी कसा पुरवणार?-शरद पवार

शरद पवार यांचा खोचक विखे पाटील यांना खोचक टोला

सुजय विखे पाटील यांचा बालहट्ट मी कसा पुरवणार?-शरद पवार
शरद पवार

सुजय विखे पाटील यांचा बालहट्ट मी कसा पुरवणार? सुजय विखे पाटील ही राज्यस्तरावरची मोठी फिगर होती असे नाही. त्यांचा बालहट्ट पुरवण्याची जबाबदारी इतर पक्षाची नाही. माझ्या घरातल्या मुलांचा हट्ट मी पुरवू शकतो. मात्र दुसऱ्याच्या घरातल्या मुलांचा हट्ट मी कसा पुरवणार? आणि ते चांगलेही दिसणार नाही असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुजय विखे पाटील यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.

एवढंच नाही तर राज्यात जवळपास सगळ्या जागांचे प्रश्न निकाली निघाले आहेत. लवकरच संयुक्तरित्या जागाही जाहीर केल्या जातील अशीही माहिती शरद पवार यांनी पत्रकारांना दिली. मला अनेकांनी निवडणूक लढवण्याची विनंती माझ्या निर्णयानंतर केली आहे. मी ऐकतो आणि त्याचा आनंद घेतो. आता मला थांबलं पाहिजे कारण माझं वय 79 आहे असंही शरद पवार म्हटले आहेत.

अमित शाह यांच्यावरही त्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. अमित शाह यांनी 45 जागा नाही 48 जागा जिंकू म्हणायला हवं होतं असा टोला शरद पवार यांनी पुन्हा एकदा लगावला. तर प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत होतेच कधी? असा प्रतिप्रश्न शरद पवार यांनी विचारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2019 9:23 pm

Web Title: sharad pawars reaction on sujay vikhe patils bjp entry
Next Stories
1 महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय, काळजी घ्या-जितेंद्र आव्हाड
2 वडिलांच्या इच्छेविरोधात निर्णय घेतला: सुजय विखे-पाटील
3 सुजय विखे-पाटलांच्या हातात ‘कमळ’, नगरमधून लोकसभेची उमेदवारी
Just Now!
X