09 March 2021

News Flash

ओबीसी जागृतीस राजदचे शरद यादव आज बीडमध्ये

ओबीसींची जातवार जनगणना व्हावी, ओबीसी समाज एकत्र आला तरच मंडल आयोगाच्या शिफारसी सरकारला लागू करणे भाग पडेल, या साठी उद्या (रविवारी) येथे ओबीसी जागृती मेळाव्याचे

| August 10, 2014 01:20 am

ओबीसींची जातवार जनगणना व्हावी, ओबीसी समाज एकत्र आला तरच मंडल आयोगाच्या शिफारसी सरकारला लागू करणे भाग पडेल, या साठी उद्या (रविवारी) येथे ओबीसी जागृती मेळाव्याचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांच्यासह राज्यातील नेते या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक प्रा. सुशिला मोराळे यांनी दिली.
देशात १९९० मध्ये सरकारने ३ हजार ७४३ जातींचा, तर राज्यात २७२ जातींचा ओबीसीत समावेश केला. मंडल आयोगाच्या शिफारशी अजून लागू झाल्या नाहीत. भूमिहिनांना जमीन द्यावी, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे याकडे सरकारने दुर्लक्ष केले. ओबीसी समाज एकत्र आल्याशिवाय सरकार आयोगाच्या शिफारसी लागू करणार नाही, या साठी ओबीसींची जागृती करण्यासाठी शरद यादव यांच्या उपस्थितीत मेळावा होत आहे. वैधानिक मंडळाचे माजी अध्यक्ष प्रताप बांगर, परीट धोबी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी िशदे, माजी केंद्रीय मंत्री निहाल अहमद, माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले, प्रताप होगाडे आदी उपस्थित राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2014 1:20 am

Web Title: sharad yadav in beed
टॅग : Beed,Obc,Sharad Yadav
Next Stories
1 पूर्वपरीक्षेचा निकाल रखडला, सप्टेंबरच्या तयारीवर प्रश्नचिन्ह
2 प. महाराष्ट्रातील बंद ८ नाक्यांची चंद्रपूर जिल्ह्य़ातून टोलवसुली!
3 आदिवासीना नोकरीची हमी देणारा राज्यपालांचा आदेश धूळखात
Just Now!
X