15 January 2021

News Flash

डॉ. शीतल आमटे आत्महत्या: तपासासाठी विशेष पथकाला पाचारण

आमटे परिवारात काही महिन्यांपासून अंतर्गत संघर्ष असल्याची चर्चा

डॉ. शीतल आमटे

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉक्टर शीतल आमटे–करजगी यांचा सोमवारी मृत्यू झाला. शीतल आमटे यांनी विषाचे इंजेक्शन घेतले असल्याची माहिती समोर आली. त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं होतं, पण तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकार्‍यांनी डॉ. शितल यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र पोलिसांनी शीतल आमटे यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. चंद्रपूरच्या आनंदवन ग्रामपंचायत विभागात त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केल्याची सर्वत्र चर्चा आहे. त्यांच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी नागपूरहून विशेष तपास पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. सध्या तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतरच अधिक माहिती देणं शक्य आहे अशी माहिती चंद्रपूरच्या पोलीस अधिक्षकांनी दिली.

आणखी वाचा- जंगल उभारण्यापासून ते स्मार्ट व्हिलेजपर्यंत… असा आहे शीतल आमटेंचा जीवनप्रवास

शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला होता. शीतल आमटे या सर्व वादाच्या केंद्रस्थानी होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. त्या मानसिक तणावात असल्याचे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2020 9:10 am

Web Title: sheetal amte granddaughter of baba amte suspicious death case special team called from nagpur for investigation vjb 91
Next Stories
1 यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या, घाटात धारदार शस्त्राने वार
2 एमटीडीसी पुणे विभागात कोयनानगर निवासस्थान याच महिन्यात होणार सुरू
3 पंकजा मुंडे विलगीकरणात, ट्वीट करत दिली माहिती
Just Now!
X