06 July 2020

News Flash

तबल्यासाठी ‘शेलार लिपी’!

‘जे लिहिलेले असते, ते वाजवायचे नाही आणि जे वाजवायचे असते, ते लिहिलेले नसते’, अशी गमतीची स्थिती तबल्याच्या लिपीबाबत होती. खरेतर तबल्याच्या मात्रा आणि कायदे हे

| December 26, 2014 01:40 am

‘जे लिहिलेले असते, ते वाजवायचे नाही आणि जे वाजवायचे असते, ते लिहिलेले नसते’, अशी गमतीची स्थिती तबल्याच्या लिपीबाबत होती. खरेतर तबल्याच्या मात्रा आणि कायदे हे गणितात बसल्याने त्याची लिपी नव्याने मांडता येईल, असे वाटल्यानंतर वयाच्या ४५व्या वर्षी तबला शिकणाऱ्या संजीव शेलार यांनी तबल्याची स्वतंत्र लिपी विकसित केली आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करणाऱ्या25shelar औरंगाबादच्या संजीव शेलार यांचे ‘परिपूर्ण तबला लिपी’ हे पुस्तक १ जानेवारी रोजी तापडिया नाटय़मंदिरात प्रकाशित होणार आहे.
 गायनाच्या अंगाने आवश्यक असणारी वादनाची लिपी पूर्वी अस्तित्वात होती. मात्र त्याचा साचा गायकीच्या अंगाने जाणारा होता. भाषा अस्तित्वात असतेच, त्याची लिपी नंतर होते. या क्षेत्रात नेमके उलटे होत होते. काही वेळा लिपीसाठी भाषा बदलावी लागत असे, त्यामुळे काव्यच कळत नसे. रचनेचे सौंदर्य हरवून जात. तबला शिकताना ही गोष्ट लक्षात आली आणि सहा वर्षांच्या प्रयत्नानंतर शेलार यांनी तबल्याची स्वतंत्र लिपी निर्माण केली आहे.
संगीताची लिपी म्हणजे संगीतातील रचना तालाच्या मात्रेत कशी आहे, हे दाखविणे. या मात्रा गणिती चौकटीत चांगल्या उमजल्यामुळे अशी लिपी तयार करू शकलो, असे शेलार यांनी सांगितले. १८ वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात घालविल्यानंतर अमेरिकेहून परतलेल्या संजीव शेलार यांना तबला शिकावा, असे वाटले. महाविद्यालयात असताना सवाई गंधर्व महोत्सव ऐकला आणि संगीताचा कान तयार झाला. अमेरिकेहून परतल्यानंतर काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती म्हणून ते तबला शिकले. शिकताना इतरांनी लिहिलेल्या वहय़ा तपासल्यानंतर लिपीच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लिपी निर्माणाचे काम हाती घेतले. त्यासाठी गांधर्व महाविद्यालयातून अनेक पुस्तके आणि संशोधन अहवालाचा आधार त्यांनी घेतला. त्यामुळे तबल्याची नवीन शेलार लिपी विकसित झाली आहे. या लिपीच्या विषयीचे पुस्तक राजहंस प्रकाशनामार्फत प्रकाशित होणार आहे. या वेळी कार्यक्रमास पंडित सुरेश तळवलकर, पंडित सुधीर माईणकर, नाथराव नेरळकर, शुभदा पराडकर, प्रमोद मराठे, उमेश मोघे, रामदास पळसुले आदींची उपस्थिती असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2014 1:40 am

Web Title: shelar lipi for tabla
टॅग Aurangabad,Music
Next Stories
1 भाजपचे स्वच्छता अभियान फक्त फोटोसाठी!
2 अमर्याद पाणीउपश्यावर बंधने हवीत – अण्णा हजारे
3 वर्षभरात ५३ लाचखोर जेरबंद; लाचखोरीत पोलीसच आघाडीवर
Just Now!
X