दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर सध्या शिंपल्यांचा सडा पसरला आहे. वायू वादळामुळे हजारोंच्या संख्येने  शिंपले किनारपट्टीवरील भागात वाहून आले आहेत. हे शिंपले वेचण्यासाठी स्थानिकांनी समुद्र किनाऱ्यावर गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. .

अरबी समुद्रात आठवडभरापुर्वी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्र खवळलेला होता. परिणामी समुद्री वातावरणात बदल झाला व या बदललेल्या वातावरणामुळे अजस्त्र लाटा समुद्रात व किनाऱ्यावर धडकत होत्या. समुद्रातील उसळणाऱ्या लाटा किनाऱ्यावर येत असल्याने समुद्रातील छोटे जीवजंतू हे देखील समुद्र किनारी लाटांद्वारे  वाहून आलेले आहेत. वायू चक्रीवादळाच्या तडाख्याने आलेल्या लाटांच्या वेगाने हजारो शिंपले समुद्र किनारी वाहून आलेले आहेत. समुद्रातील वादळाचा जोर कमी झाल्याने समुद्र किनाऱ्यावर शिपल्याचा सडा पसरलेला दिसत आहे.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
engineers design light weight ai jackets
कुतूहल : सीमेवरील सैनिकांचा सखा!
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी