News Flash

शिर्डीजवळ ट्रकला कारची धडक, दोन ठार; ४ जखमी

संगमनेरजवळ पुणे- नाशिक महामार्गावर भरधाव कारने ट्रकला धडक दिली. कारने ट्रकला पाठीमागून धडक दिली.

प्रतिकात्मक छायाचित्र

शिर्डीतील संगमनेरजवळ भरधाव कारने ट्रकला धडक दिली असून भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारमधील सर्व प्रवासी हे नाशिकचे रहिवासी असल्याचे समजते.

संगमनेरजवळ पुणे- नाशिक महामार्गावर भरधाव कारने ट्रकला धडक दिली. कारने ट्रकला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 11:57 am

Web Title: shirdi 2 passenger killed 4 injured in car truck collision on nashik pune highway near sangamner
Next Stories
1 गिरीश बापट यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केला, हायकोर्टाचे ताशेरे
2 डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खूश असेल: नीलेश राणे
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X