News Flash

शिर्डी विमानतळाचा विस्तार होणार

सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

शिर्डी विमानतळाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता शिर्डी विमानतळाचा विस्तार करून तेथे नवीन टर्मिनल इमारत बांधण्याचे काम सुरू करावे. ही इमारत पूर्ण होईपर्यंत जुन्या टर्मिनलचा विस्तार तातडीने करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीदरम्यान, उडाण योजना तसेच ‘रिजनल कनेटिव्हीटी स्किम’ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विमानांचा आढावा घेण्यात आला. तसेच कंपनीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या अमरावतीतील बरोरा, पुरंदर, सोलापूर, चंद्रपूर येथील विमानतळांच्या प्रगतीचाही आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

मिहान विशेष आर्थिक क्षेत्रात डिफेन्स हबसाठी जेएसआर डायनॅमिक्स या लष्करी सामग्री निर्मिती करणाऱ्या कंपनीने जागेची मागणी केली होती. या कंपनीसाठी 27 एकर जागा देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मिहानमध्ये आणखी काही कंपन्यांनी युनिट सुरू करण्यास उत्सुकता दाखवली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच अमरावती येथील विमानतळाचे काम सुरू झाले आहे. इतरही विमानतळ, तेथील धावपट्टी यांची कामेही वेगाने सुरू करावीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 5:59 pm

Web Title: shirdi airport extension cm devendra fadnavis jud 87
Next Stories
1 चिखलफेक प्रकरणात नितेश राणेंना सर्शत जामीन मंजूर
2 राष्ट्रवादीचा आणखी आमदार शिवसेनेत, पांडुरंग बरोरा शिवबंधनात अडकले
3 एका कोंबडीच्या पिसाच्या आधारे उलगडलं हत्येचं कोडं, ठाणे पोलिसांची जबरदस्त कामगिरी
Just Now!
X