News Flash

शिर्डी संस्थानातील ड्रेसकोडबाबत रोहित पवारांचं रोखठोक मत, म्हणाले…

शिर्डी ड्रेसकोड प्रकरण सध्या चांगलंच गाजतंय...

शिर्डी देवस्थानकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या ड्रेसकोडसंबंधी एक फलक लावण्यात आला होता. या निर्णयाच्या फलकाविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी देवस्थानच्या पुजाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. त्यानंतर आज फलक हटवण्यासाठी तृप्ती देसाई पुण्याहून शिर्डीला निघाल्या असताना त्यांना रस्त्यातच अडवण्यात आले. या प्रकरणानंतर शिर्डी संस्थानाच्या या फलकावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या विषयावर रोखठोक मत मांडलं.

“मंदिरात जाताना कोणते कपडे घालावेत, हे आपल्या देशाची संस्कृती सांगते. लोकांना ही गोष्ट कळते. मंदिरात जाताना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत हे भाविकांना सांगण्याची गरज नाही. असे असूनही आपण मंदिरात फलक लावणार असू तर ती गोष्ट योग्य नाही. आपण कसे वागावे हे आपले संविधान आपल्याया सांगते. संविधानाच्या पलीकडे जाऊन आपली संस्कृतीसुद्धा आपल्याला वर्तनाबाबत योद्य मार्गदर्शन करत असते. अशा परिस्थितीत मुद्दाम कोणी बोर्ड लावत असेल, तर ती गोष्ट योग्य आहे असे मला वाटत नाही,” असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.

काय आहे फलक प्रकरण

शिर्डीमधील साई मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 7:12 pm

Web Title: shirdi saibaba temple dress code debate rohit pawar reaction backs decency in premises but unhappy with banner vjb 91
Next Stories
1 मोठी बातमी!… राज्यात शनिवारपासून शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त
2 जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा रद्द; भाविकांना तीन दिवस जेजुरीत प्रवेश नाही
3 ३१ डिसेंबरपर्यंत तो फलक हटवला नाहीतर…; तृप्ती देसाईंचा साई संस्थानला इशारा
Just Now!
X