25 February 2021

News Flash

शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा

महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. महाविकास आघाडीला लागलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. आज खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, अशातच त्यांचा राजीनामा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द देण्यात आल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं होतं. तसंच कॅबिनेट मंत्रिपद न दिल्यानं ते नाराज होते, असं सांगण्यात येत आहे. अब्दुल सत्तार हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसंच औरंगाबादमधील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या समिकरणावरूनही ते भाजपाच्या जवळ असल्याचं दिसून येत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

अब्दुल सत्तार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर सिल्लोड मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान देणार असल्याची त्यांना आशा होती. त्यांना शिवसेनेकडून राज्यमंत्रिपद देण्यात आलं. तर पैठणचे आमदार संदीप भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं होतं. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं सत्तार नाराज होते. परंतु खातेवाटपापूर्वी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 10:52 am

Web Title: shiv sena abdul sattar resign from his post mahaivkas aghadi maharashtra government jud 87
Next Stories
1 प्रार्थनेद्वारे आजार बरे करण्याच्या भूलथापा, धर्मप्रचाराकाविरोधात गुन्हा दाखल
2 शिवसेनेने विचारधारेशी विश्वासघात केला
3 सांगलीत महाविकास आघाडीची संधी हुकली
Just Now!
X