07 August 2020

News Flash

सेनेचा आक्रमक पवित्रा आणि पोलीस अधिकाऱ्यांची दिलगिरी!

काँग्रेस आघाडीच्या राजवटीत विरोधी पक्षांच्या, त्यातही शिवसेना कार्यकर्त्यांवर पोलिसी दादागिरी करणारे उपअधीक्षक विजय कबाडे यांनी गुरुवारी शिवजयंतीच्या उत्साही वातावरणात सेना कार्यकर्त्यांवर लादलेला जुना प्रयोग त्यांच्या

| February 20, 2015 01:10 am

asaduddin owaisi : आपल्या गळ्यावर कुणी चाकू लावला तरी ‘भारतमाता की जय’ असे कधीच बोलणार नाही, असे ओवेसी म्हणतात. खरे म्हणजे अशा लोकांच्या गळ्यास फक्त चाकू कसला लावता? त्यांची गर्दनच कायद्याने उडवायला हवी, अशा शब्दांत सेनेने ओवेसींवर हल्ला चढवला आहे.

काँग्रेस आघाडीच्या राजवटीत विरोधी पक्षांच्या, त्यातही शिवसेना कार्यकर्त्यांवर पोलिसी दादागिरी करणारे उपअधीक्षक विजय कबाडे यांनी गुरुवारी शिवजयंतीच्या उत्साही वातावरणात सेना कार्यकर्त्यांवर लादलेला जुना प्रयोग त्यांच्या अंगलट आला. तीन आमदारांसह सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाल्यामुळे कबाडेंना दिलगिरी व्यक्त करावी लागली, तर पोलीस अधीक्षकांना नरमाईचे धोरण स्वीकारावे लागले.
बुधवारी सकाळी शिवजयंतीनिमित्त तरुणांचा एक गट दुचाकीवर निघाला असता कबाडे व सहकाऱ्यांनी त्यांना अटकाव केला. या प्रकाराने शिवाजीनगर भागात तणाव निर्माण झाला. शहरातील काही तरुण दुचाकीवर भगवे झेंडे लावून शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोरून गुरुवारी सकाळी ११ वाजता जात होते, तेवढय़ात कबाडे यांचे वाहन शिवाजीनगर ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी लगेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना सांगून या तरुणांना ठाण्यात आणले. यातील सचिन पवार या तरुणाला अवघड जागी मारहाण करण्यात आली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. परंतु सचिनने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्यामुळे हा प्रकार घडल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. हे वृत्त कळताच शेकडो शिवरायभक्त ठाण्यासमोर जमले. जय भवानी जय शिवराय, तुमचे आमचे नाते काय, पोलिसांचे झाले काय, कबाडेंवर कारवाई करा, पोलिसांचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
शिवसेना जिल्हाप्रमुख भुजंग पाटील डक, मिलिंद देशमुख, सहसंपर्क प्रमुख प्रकाश कौडगे, लोह्य़ाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील तेथे आल्यावर तरुणांमध्ये जोश संचारला. त्यांनी पुन्हा घोषणाबाजी केली. या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, पंकज देशमुख यांच्यासोबत नेत्यांनी चर्चा केली. परंतु ती निष्फळ ठरली. या नंतर अधीक्षक परमजितसिंह दहिया तेथे आले. त्यांच्याशी चर्चेनंतर हा प्रकार गैरसमजातून घडल्याचे कबाडे यांनी सांगून दिलगिरी व्यक्त केली. कोणत्याही तरुणाविरुद्ध पोलीस कारवाई केली जाणार नाही, दुचाकी चालकाचा दंड माफ करू, अशी ग्वाही दहिया यांनी दिली. सण शांततेत साजरा करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केल्यानंतर जमाव पांगला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2015 1:10 am

Web Title: shiv sena aggressive and excuse of police officer
टॅग Nanded
Next Stories
1 भाजप सरकार त्यांची नैतिक जबाबदारी काय मानतात? – मुक्ता दाभोलकरांचा प्रश्न
2 ‘पानसरे यांच्यावरील हल्ला हा विचारवंत संपविण्याचा प्रयत्न’
3 ‘धर्मनिष्ठ राष्ट्राच्या हट्टापायी भारताचा पाकिस्तान होईल’
Just Now!
X