21 October 2020

News Flash

जैतापूर प्रकल्पविरोधाची सेनेची भूमिका कायम

पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या संदर्भात पुढील महिन्यात जैतापूरला प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार आहेत.

उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे मेळावा घेणार
राजापूर तालुक्यातील जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पाला विरोधाची शिवसेनेची भूमिका कायम असून त्या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढील महिन्यात पुन्हा एकदा तेथे मेळावा घेणार आहेत.
पाच वर्षांपूर्वी, १८ एप्रिल रोजी या ठिकाणी झालेल्या हिंसक आंदोलनाच्या वेळी तबरेज साहेकर याचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाला. त्याच्या स्मृतिदिनानिमित्त नाटे येथे आयोजित मेळाव्यात बोलताना स्थानिक आमदार राजन साळवी यांनी सांगितले की, या प्रकल्पाच्या विरोधात विविध पातळ्यांवर शिवसेनेतर्फे भूमिका मांडली जात आहे. विधानसभेतही हा प्रश्न मांडण्यात आला, पण मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे शिवसेनेने विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या संदर्भात पुढील महिन्यात जैतापूरला प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार आहेत. त्यावेळी होणाऱ्या मेळाव्यात पक्षाची अधिकृत भूमिका आणि भावी आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल.
दरम्यान सेनेचा या प्रकल्पाला सुरवातीपासूनचा विरोध आजही कायम असला तरी आंदोलनात्मक शक्ती सातत्याने क्षीण झाली आहे. विशेषत: केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार आल्यापासून भाजपाने प्रकल्पाचे उघड समर्थन आणि सेनेचा तात्त्विक विरोध, अशी स्थिती राहिली आहे. सेनेने एकही मोठे आंदोलन या परिसरात केलेले नाही. केवळ या परिसरातील मच्छिमारांच्या संघटित विरोधाच्या बळावर सेना आपले विरोधी अस्तित्व टिकवून असल्याचे चित्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 2:08 am

Web Title: shiv sena continues to oppose jaitapur nuclear power project
Next Stories
1 पालकांच्या उपोषण इशाऱ्यानंतर मुरुड दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल
2 ब्रिटिशकालीन वखारीच्या जागेचा हस्तांतरण वाद मिटेना
3 नियमांच्या वादात नंदुरबारमध्ये गुटखा तस्कर मोकाट
Just Now!
X