पालघर जिल्ह्यातील आठ पंचायत समिती मधील सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीत शनिवारी झालेल्या निवडणुकीत पालघर, डहाणू, वाडा विक्रमगड व मोखाडा पाच ठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करण्यात आली आहे, तर जव्हार व वसई येथे शिवसेना व भाजपमध्ये समझोता झाला. तलासरी येथे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बहुमत असल्याने त्या पक्षाचा सभापती व उपसभापती निवड झाली आहे.

जिल्ह्यातील पालघर, वाडा, वसई व मोखाडा या चार ठिकाणी शिवसेनेचे तर डहाणू व विक्रमगड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभापती निवडून आले आहेत. तलासरीमध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने १९६२ पासून सलग ५८ वर्षे लाल बावटा फडकावत ठेवला असून जव्हार येथे जिल्ह्यात एकमेव ठिकाणी भाजपाचा सभापती निवडून आला आहे. मोखाडा येथे सारिका निकम या सलग तिसऱ्यांदा सभापतीपदी निवडून आल्या आहेत.

तालुकानिहाय निवडणूक निकाल:

सभापती पालघर- रंजना म्हसकर (शिवसेना) डहाणू- स्नेहलता सातवी (राष्ट्रवादी काँग्रेस) वाडा- योगेश गवा (शिवसेना) विक्रमगड- सुचिता कोरडा (राष्ट्रवादी काँग्रेस) मोखाडा- सारिका निकम (शिवसेना)

जव्हार- सुरेश कोरडा (भाजपा) वसई- अनुजा पाटील (शिवसेना) तलासरी- कॉ. नंदकुमार हाडळ (मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष)