‘माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र’ या मोहिमेला मंगळवारी शिवसेना शहर कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली. महिनाभर चालणाऱ्या या मोहिमेसाठी भगवा रथ तयार करण्यात आला आहे. केंद्रात ज्या प्रमाणे नमो, नमो म्हणजे नरेंद्र मोदी अशी साद घालण्यात आली त्या धर्तीवर राज्यात विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसेनेकडून उठा, उठा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नावाचा गजर करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत शिवसनिकांना हाच मंत्र देण्यात येणार आहे.
माजी शहरप्रमुख शिवाजी जाधव यांच्या हस्ते या रथाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार राजेश क्षीरसागर यांनी उठा, उठा हा मंत्र शिवसनिकांना दिला. या रथामध्ये एक एलसीडी स्क्रीन लावण्यात आला आहे. याद्वारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चित्रफितीसह शिवसेनेची वर्षभरामधील आंदोलनांची माहिती आहे. या मोहिमेंतर्गत मतदार नोंदणी विषय जागरुकता, शिवबंधन सोहळे, शिवसेना सदस्य नोंदणी यावर भर दिला जाण्णर आहे. शिवसेना शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. महिनाभर रोज सकाळी दोन रथाद्वारे प्रचार, सायंकाळी गर्दीच्या ठिकाणी मेळावे, सभा करण्याचे आयोजन केले आहे.     
टाऊन हॉल येथे िहदूहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.  शिवसनिकांनी या मोहिमेचे फलक उभारून संपूर्ण शहरात शिवसेना निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. यामधून जनतेसाठी केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवून विधानसभेवर भगवा फडकविण्याचा निर्धार यांनी व्यक्त केला. यावेळी पद्माकर कापसे, राजू जाधव, तानाजी जाधव, किशोर घाडगे, चेतन िशदे, अरिवद मेथे, धनाजी दळवी, गजानन भुर्के, सुनील भोसले, जयवंत हरुगले, अमित गायकवाड आदी उपस्थित होते.