राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. तरुणांच्या भविष्यातील सुजलाम्-सुफलाम् महाराष्ट्र घडविण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असे सांगत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले असून कर्जमाफीसाठी मोर्चाही काढल्याचे येथे सांगितले. नांदेड तालुक्यातील वाहेगाव येथे शेतकरी मेळाव्यात केले.
जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारांच्या अडचणी, सामान्यांशी संवाद साधण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे नांदेड, हिंगोली जिल्ह्यच्या दौऱ्यावर आले असून शुक्रवारी त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी पालकमंत्री रामदास कदम, पशुसंवर्धनमंत्री अर्जुन खोतकर, खासदार हेमंत पाटील, चंद्रकांत खैरे, आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पा. आष्टीकर, जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव, सचिन अहिर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्यानुसार शिवसेना हा सामाजिक भान जपणारा पक्ष आहे, असे सांगत ठाकरे म्हणाले, येणाऱ्या काळात ‘स्किल बेस शिक्षण’ विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आणून शिक्षणात आमूलाग्र बदल करण्यासाठी, तसेच तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2019 12:39 am