News Flash

भजन-किर्तनातून नव्हे तर अजान ऐकण्यातून शिवसेनेला मनःशांती मिळतेय – तुषार भोसले

"शिवसेनेला मंदिरांत घंटा बडवणारा हिंदू नको, अजान स्पर्धेचं आयोजन करणारा हिंदू हवाय."

आचार्य तुषार भोसले

शिवसेनेला भजन-किर्तनातून नव्हे तर अजान ऐकण्यातून मनःशांती मिळतेय, अशा शब्दांत भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे नेते आचार्य तुषार भोसले यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेना नेत्याकडून अजान स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्यावरुन भाजपाने ही टीका केली आहे.

भोसले म्हणाले, “शिवसेनेला आता मंदिरांत घंटा बडवणारा हिंदू नको तर अजान स्पर्धेचं आयोजन करणारा हिंदू हवा आहे. शिवसेना नेत्यांना वेदाच्या शांतिपाठातून, ज्ञानोबा-तुकोबांच्या अभंगातून आणि भजन-किर्तनातून मनःशांती मिळत नाही तर अजान ऐकण्यातून मिळत आहे.”

अजानमध्ये खूप गोडवा! शिवसेना नेत्याकडून अजान स्पर्धेचं आयोजन

“काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की हिंदुत्व हे काय धोतर आहे का सोडून द्यायला? पण उद्धवजी धोतर तरी कमरेभोवती घट्ट आवळलेलं असतं पण तुमचं हिंदुत्व हे खांद्यावरच्या उपरण्यासारखं होतं, जे तुम्ही एक वर्षापूर्वीच बाजूला काढून ठेवलं. शिवसेनेचं हिंदुत्व हे इतकं तकलादू होतं हे आता महाराष्ट्रासमोर सिद्ध झाल आहे,” अशा शब्दांत तुषार भोसले यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 4:24 pm

Web Title: shiv sena gets peace of mind not by chanting bhajan but by listening to azaan says tushar bhosale aau 85
Next Stories
1 फडणवीसांच्या त्रुटीनेच मराठा आरक्षणाला स्थगिती; राष्ट्रवादीच्या आमदाराचा आरोप
2 आत्महत्येआधी डॉक्टर शीतल आमटेंची सूचक पोस्ट
3 भांडवलदारांच्या हितासाठी भाजपाकडून शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न – थोरात
Just Now!
X