19 January 2021

News Flash

“…त्यामुळे शिवसेनेनं आम्हाला सल्ला देऊ नये”; काँग्रेसनं सुनावलं

काय म्हणाले काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण?

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपदाची जबाबदारी देणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी सुरू होती. त्यानंतर युपीएच्या अध्यक्षपदावरून शिवसेनेनं काँग्रेसला सल्ला दिला होता. युपीएचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे द्यावं, असं शिवसेनेनं म्हटलं होतं. शिवसेनेनं दिलेल्या या सल्ल्याला काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. “महाराष्ट्रात किमान समान कार्यक्रमावरून शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे,” असं म्हणत काँग्रेसनं सुनावलं आहे.

युपीएचे (संयुक्त पुरोगामी आघाडी) अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्याचा मुद्दा शिवसेनेनं मांडला होता. त्यावरून काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे. “शिवसेना हा पक्ष युपीएमध्ये सहभागी नाही. महाराष्ट्रात फक्त किमान समान कार्यक्रमावरूनच शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे युपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेनं सल्ला देऊ नये,” असं उत्तर अशोक चव्हाण यांनी दिलं आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

“शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. शरद पवारांनीही हे वृत्त नाकारलं आहे. शरद पवार महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत. पण जेव्हा युपीए अध्यक्षपदाबाबत आपण बोलत आहोत तेव्हा तसा कोणाताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. ही गोष्ट जर शरद पवारांनी स्वत: सांगितली असेल तर त्यावर चर्चा करणं योग्य नाही. आम्ही तर नेहमीच हितचिंतक राहिलो आहोत. जर असा कोणता प्रस्ताव आला तर त्याचं समर्थन करु,” असं संजय राऊत म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 5:01 pm

Web Title: shiv sena is not part of united progressive alliance says congress ashok chavan bmh 90
Next Stories
1 देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील कोरे-आवाडे यांच्या भेटीला
2 पोटनिवडणूक : पार्थ पवारांना आजोबा शरद पवार देणार का पुन्हा संधी?
3 सांगलीच्या ‘त्या’ १६ लाखांच्या बकऱ्याची चोरी
Just Now!
X