23 September 2020

News Flash

“माझ्या वाढदिवसानिमित्त एवढं करा की…”; आदित्य ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

१३ जूनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलं पत्र

शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी देशात आणि राज्यात असलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. तसंच शिवसैनिकांनी असतील त्या ठिकाणाहूनच शुभेच्छा देण्याची विनंती त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांचं शिवसैनिकांना पत्र
आज आपल्या महाराष्ट्र राज्यावरच नव्हे तर संपूर्ण जगावर करोनाचं संकट आहे. गेले २-३ महिने आपण सगळे एकत्रितपणे या संकटाविरूद्ध लढा देत आहोत आणि हा लढा देत असताना आपले सर्वांचे एकच ध्येय आहे, ते म्हणजे करोनावर मात करणं.

१३ जूनला माझा वाढदिवस आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलं आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जिथे असाल, तिथूनच मला आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात. माझी तमाम शिवसैनिक, मिंत्रमंडळी आणि सर्वांना विनंती आहे की होर्डिंग्ज, हार तुरे, केक हा सर्व खर्च टाळून तुम्ही करोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांवर खर्च करा अथवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्या, माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे एक सत्कार्य होईल आणि याचा मला निश्चितच आनंद होईल.

प्रशासनानं सांगितलेल्या नियमांचे पालन करून आपण प्रशासनाला सहकार्य करूया. तुम्ही सर्वजण करोनापासून स्वत:ची काळजी घ्या, हीच माझ्या वाढदिवसाची खरी भेट असेल. जसे तुम्ही मला आजपर्यंत प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत तसेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद यापुढेसुद्धा माझ्यासोबत राहतील हीच अपेक्षा…

आणखी वाचा- “महाराष्ट्र सैनिकांना माझा सूचनावजा आदेश आहे की…”; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र

दरवर्षी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी होते. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसैनिकांना हे पत्र लिहिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2020 12:10 pm

Web Title: shiv sena leader aditya thackeray writes letter to party workers not to come to celebrate his birthday coronavirus jud 87
Next Stories
1 “…म्हणून सर्वांनी १२ जूनला संध्याकाळी पाच वाजता एक मिनिट हॉर्न वाजवा”; ‘Horn OK Please’ची मनसे हाक
2 “परमेश्वरानं इतकं निष्ठूर होऊ नये…”, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली हळहळ
3 राज ठाकरेंच्या सुरक्षारक्षकांनी जिंकली करोनाविरुद्धची लढाई
Just Now!
X