News Flash

सेना तालुकाप्रमुखाची चोरटय़ांकडून हत्या

नगर व बीड जिल्ह्य़ांच्या सरहद्दीवरील जामखेड (नगर)जवळील मोहा गावाच्या शिवारात मंगळवारी मध्यरात्री रस्त्यात गाडी अडवून लूटमार करताना चोरटय़ांनी मुखेड (जिल्हा नांदेड) येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख शंकर

| September 4, 2014 04:47 am

नगर व बीड जिल्ह्य़ांच्या सरहद्दीवरील जामखेड (नगर)जवळील मोहा गावाच्या शिवारात मंगळवारी मध्यरात्री रस्त्यात गाडी अडवून लूटमार करताना चोरटय़ांनी मुखेड (जिल्हा नांदेड) येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख शंकर माधवराव ठाणेकर (वय ४५) यांची निर्घृण हत्या केली. त्यांच्याकडील इनोव्हा मोटारीसह साडेसहा लाख रुपयांचा ऐवजही या चोरटय़ांनी लांबवला. त्यांच्यासोबत असलेले कंधारचे शिवसेना तालुकाप्रमुख भालचंद्र नाईक हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
ठाणेकर आणि नाईक हे आपल्या गाडीतून जामखेडजवळील मोहा शिवारातून जात असताना मागून आलेल्या गाडीने त्यांची वाट रोखली. त्यातून उतरलेल्या सात-आठ जणांनी आपल्या हातातील शस्त्रांसह ठाणेकर यांच्यासह सर्वाना मारहाण सुरू केली. यावेळी ठाणेकर यांच्यावर गुप्तीने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी ठाणेकर यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कमही लुटली. त्यानंतर ठाणेकर यांची गाडी घेऊनच ते पसार झाले. मात्र या गाडीचा टायर फुटल्यामुळे चोरटय़ांनी ती कर्जत तालुक्यातील रुईगव्हण गावाजवळ सोडून दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 4:47 am

Web Title: shiv sena leader killed at karjat
Next Stories
1 नक्षलवाद्यांची तेलंगणात विलिनीकरण दशकपूर्ती
2 भूजल गुणवत्ता देखरेख केंद्रांची कमतरता
3 शिक्षक दिनानिमित्त मोदींचे भाषण ऐच्छिक – केंद्र सरकार
Just Now!
X