News Flash

बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना सोडलेल्यांनी स्मारकावर बोलू नये; शिवसेनेचा मनसेला टोला

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून मनसेनं साधला होता निशाणा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ८ वा स्मृतीदिन आहे. दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. परंतु करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्याव्यात, असं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील जागा घेण्यात आली आहे. परंतु अद्याप त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आलं नाही. यावरून आता मनसेनं सरकारवर टीका केली आहे. “स्मारक की मातोश्री ३?” असा खोचक सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी संजय राऊतांनी भाजपावर साधला निशाणा, म्हणाले…

“ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना हयातीत सोडलं त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर बोलू नये,” असं म्हणत संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावला. हिंदुत्वावरुन भाजपा शिवसेनेवर करत असलेल्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आमचं हिंदुत्व प्रमाणित करण्यासाठी, स्प्ष्ट करण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू, आम्हाला तुमच्याकडून प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही कधीच हिंदुत्वाचं राजकारण करत नाही. देशात जिथे कुठे गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहील”.

आणखी वाचा- बाळासाहेबांचं स्मारक की मातोश्री तीन?; मनसेचा सवाल

काय म्हणाले होते देशपांडे?

“महापौर बंगला घेऊन आता तीन वर्ष होत आली. परंतू हा बंगला अजूनही बंदीस्तच आहे. २३ जानेवारी आलं किंवा १७ नोव्हेंबर आलं तर निविदा काढल्यात, काम सुरू आहे इतक्याच बातम्या आम्हाला पाहायला मिळतात. खरोखर ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक असेल तर ते बंदीस्त का आहे. ते जनेसाठी का खुलं नाही? जनतेला त्या ठिकाणी का जाता येत नाही?, कोणाची खासगी मालमत्ता असल्यासारखं ते का वापरलं जातंय?,” असे सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 1:19 pm

Web Title: shiv sena leader sanjay raut criticize mns sandeep deshpande balasaheb thackeray samarak mayor bunglow mumbai jud 87
Next Stories
1 “पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडलं?,” भास्कर जाधव यांच्याकडून शिवसैनिकाची पाठराखण
2 बाळासाहेबांची आठवण काढत फडणवीसांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला, म्हणाले…
3 बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी संजय राऊतांनी भाजपावर साधला निशाणा, म्हणाले…
Just Now!
X