08 August 2020

News Flash

एक शरद… सगळे गारद! ; संजय राऊतांनी प्रसिद्ध केला मुलाखतीचा टिझर

तीन भागात दिसणार ही मुलाखत

राज्यात सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार महाविकास आघाडीचे शिल्पकार असल्याचं म्हटलं जात आहे. अनेकदा राऊत यांनीदेखील तसा दावा केला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची एक मुलाखत घेतली असून त्यांनी नुकताच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध केला आहे.

एक शरद, सगळे गारद…! अशा मथळ्याखाली राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध केला आहे. ही मुलाखत तीन भागांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. तसंच या मुलाखतीचा पहिला भाग ११ जुलै रोजी शिवसेनेच्या मुखपत्रातून आणि डिजिटल माध्यमाद्वारे प्रसिद्ध केला जाणार आहे. तसंच त्यानंतर १२ आणि १३ जुलै रोजी या मुलाखतीचा दुसरा आणि तिसरा भागही पाहायला मिळणार आहे.

करोनापासून सरकार स्थापनेपर्यंत, तसंच राममंदिराशी संबंधित प्रश्नांना शरद पवार हे उत्तर देत असल्याचं या टिझरमध्ये दिसत आहे. यापूर्वीही राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत असो किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची घेतलेली मुलाखत असो, या मुलाखती फारच गाजल्या होत्या. राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. दरम्यान, तीन चाकांचं सरकार अधिक काळ चालणार नाही असा आरोप अनेकदा विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ही मुलाखत महत्त्वाची मानली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 10:02 am

Web Title: shiv sena leader sanjay raut interview of ncp suprimo sharad pawar maharashtra mahavikas aghadi teaser twitter jud 87
Next Stories
1 … तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजवण्याचे धंदे सुरूच : शिवसेना
2 सातपाटी बंधाऱ्याच्या लांबीत वाढ
3 काळमांडवी धबधबा पर्यटनस्थळी सुरक्षा ऐरणीवर
Just Now!
X