News Flash

संजय राऊत म्हणाले, गृहखातं शिवसेनेकडं राहणार आणि मुख्यमंत्र्यांकडेच राहणार

हिवाळी अधिवेशनानंतर खातेवाटप

(संग्रहित छायाचित्र)

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचं सरकार चार दिवसात कोसळल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतली. मात्र, खातेवाटपाचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. महाविकास आघाडीतील खातेवाटपाविषयी बोलताना संजय राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली. “राज्याचं गृहखात हे शिवसेनेकडं असेल आणि ते मुख्यमंत्र्यांकडेच राहिलं,” असं राऊत म्हणाले.

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. सहा मंत्र्यांचा शपथविधी झाला. मात्र, अद्यापही खातेवाटप करण्यात आलेलं नाही. खातेवाटप कधी अशी चर्चा राज्यात सुरू असताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची ‘लोकसत्ता डॉट कॉम’नं मुलाखत घेतली. या मुलाखती संजय राऊत यांनी मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाचं चित्र स्पष्ट केलं.

खातेवाटपाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “मी खात्रीनं सांगेल की गृहखात शिवसेनेकडं राहिल आणि खास करून मुख्यमंत्र्यांकडे राहिल. ते मुख्यमंत्र्यांकडं असाव अशी आमची भूमिका आहे. कारण राज्याच्या कायदा सुव्यवस्थेबाबत इतर काही घडी बसवण्यात ते खात महत्त्वाचं आहे. महसूल खात्यावर काँग्रेसनं हक्क सांगितला आहे. त्यांना मिळायला ते हरकत नाही. बाकी राष्ट्रवादीत काही अनुभवी नेते आहेत. त्यांना महत्त्वाची खाती मिळायला हवी. जयंत पाटील यांनी अर्थ खात बघितलं आहे. त्यामुळे मिळायला हरकत नाही. खोतवाटप हा काही वादाचा विषय नाही. आघाडी सरकारमध्ये देवाण आणि घेवाण दोन्ही कराव लागतं. आघाडीत जो मोठा भाऊ असतो, त्याला थोडा जास्त त्याग करावा लागतो. ते आम्ही स्वीकारलेलं आहे. उद्धव ठाकरे यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. ते ओरबडणारे नेते नाहीत. टिकवायच ना? तर मग सगळे मिळून टिकवू. अशीच त्यांची भूमिका असते,” असं संजय राऊत म्हणाले.

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याविषयावरही राऊत यांनी भाष्य केलं. राऊत म्हणाले, “सहा मंत्री सध्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित बैठक झाली. त्या बैठकीत खातेवाटप जवळजवळ पूर्ण झाले आहे. त्यात असं ठरल आहे की, नागपूरच हिवाळी अधिवेशन पाच ते सात दिवसांचं आहे. ते होऊ द्यायचं. अधिवेशन झाल्यानंतर विस्तार करावा. संख्येनुसार खात्यांचं वाटप झालेलं आहे. शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्र्यांसह १५ खाती आहेत. १६ खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहेत. उर्वरित १२ खाती काँग्रेसकडे असणार आहेत. असं खात्याचं वाटप झालं आहे,” असंही राऊत या मुलाखतीत म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 6:55 pm

Web Title: shiv sena leader sanjay raut ministry expansion ministry distribution bmh 90
Next Stories
1 “मी भाजपा सोडते आहे, या वावड्या कुठून आल्या?”
2 “शिवसेना आणि भाजपाचं रक्त हिंदुत्त्वाचं, युतीबाबत आशावादी”, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ
3 मंत्रिमंडळ बैठकीत उद्धव ठाकरे सरकारचा निर्णयांचा धडाका
Just Now!
X