28 September 2020

News Flash

उद्या मलाही अर्बन नक्षलवादी ठरवतील; संजय राऊत यांचं खळबळजनक विधान

बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की, मला हिंदूंचा खोमेनी व्हायचं नाही.

शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत. (संग्रहित छायाचित्र)

कोरेगाव भीमा प्रकरण, एनआरसी व सीएए कायद्याला झालेला विरोध या प्रकरणांवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एका मुलाखतीत रोखठोक भाष्य केलं. “मुस्लीम समाजाला दुय्यम नागरिक मानता येणार नाही. पण, आता ठरवून आपण फाळणीच्या दिशेनं जात आहोत,” असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर अर्बन नक्षलवाद्याच्या मुद्यावर बोलताना “उद्या मलाही असं ठरवलं जाईल,” असं खळबळजनक विधान संजय राऊत यांनी केलं.

एका मुलाखतीत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर भूमिका मांडली. पत्रकार राजू परूळेकर यांनी घेतलेल्या या मुलाखतीत “भाजपाच्या काळात अर्बन नक्षलवादी ठरवून विचारवंतांना, डाव्या संघटनांच्या लोकांना विविध कायद्यांखाली अटक करण्यात आलं. त्याचबरोबर मुस्लीम समाजाला दुय्यम नागरिकत्व दिलं जात आहे,” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं.

“मुस्लीम समाजाला दुय्यम नागरिक मानता येणार नाही. पण, आता ठरवून आपण फाळणीच्या दिशेनं जात आहोत. प्रखर हिंदुत्ववादी आहे. तो विचार मी सातत्यानं मांडत आलो आहे. आयोध्येला कार्यक्रमही हिंदुत्वाला जाग आणण्यासाठीच केला. पण, आमचं हिंदुत्व विखारी नाही. विषारी नाही. हा देश तुटावा. या देशात आणखी एक पाकिस्तान निर्माण व्हावा आणि सतत संघर्ष करून आम्ही व्होट बँक तयार कराव्यात, हा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार कधीच नव्हता. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की, मला हिंदूंचा खोमेनी व्हायचं नाही. पण, सध्या जशा पद्धतीनं काम होत आहे, त्यातून धार्मिक अराजक निर्माण होऊ शकतं. हे अराजक निर्माण होऊन कुणाला राज्य करायचं असेल, तर हा देश टिकणार नाही. देशात सतत अशांतता आणि अस्थिरता माजेल. तुम्ही पंतप्रधान राहाल, गृहमंत्री राहाल, पण देश राहणार नाही. देशच राहिला नाही, तर तुमचं कसं होणार? पुढच्या पिढीचं काय होणार? याचं भान ठेवलं पाहिजे,” असा इशारा राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या मोदी यांना दिला.

“जर नक्षलवाद या देशाला पोखरत असेल, तर आपले कायदे अत्यंत कठोर आहेत. सरकारनं कायदेशीर कारवाई वेगानं करायला हवी. आणि अशा लोकांच्या मुसक्या बांधा. कायदा कशासाठी आहे. कायद्याचं राज्य टिकवण्याची जबाबदारी नरेंद्र मोदी यांची आहे. कारण ते लोकशाहीसाठी लढलेले गृहस्थ आहेत. तुम्ही कठोर असायला हवं. पण, कुणाला चिरडून राज्य करता येणार नाही. असं नाही चालणार. हा देश परत तुटला, तर कायमचा तुटेल. मला असं वाटतंय या देशात गृहयुद्ध सुरू झालं आहे. ज्या पद्धतीचं वातावरण मला देशात दिसतं, ते भयंकर आहे. अर्बन नक्षलवादाचा उल्लेख झाला. उद्या तुम्हाला व मलाही अर्बन नक्षलवादी ठरवलं जाईल. कठोर आणि स्वतंत्र बाण्यानं बोलण्याचा प्रयत्न करता. अशा तऱ्हेनं बोलणाऱ्यांना फासावर द्यावं, पण खटला चालवू द्यावा,” असं संजय राऊत म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 11:59 am

Web Title: shiv sena leader sanjay raut opinion on urban naxalism bmh 90
Next Stories
1 औरंगाबाद रेल्वे दुर्घटना: मृत मजुरांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाखांची मदत, उद्धव ठाकरेंची घोषणा
2 चार दिवसात वाढले १०,००० रुग्ण; मुंबईतील संख्या सर्वाधिक
3 धक्कादायक! औरंगाबादमध्ये १६ मजूरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू
Just Now!
X