News Flash

पुढच्या पिढीनेही विचारावे, ये पाकिस्तान किधर था: संजय राऊत

हल्ल्याचा निषेध करणे, बदला घेणे ही मोठी गोष्ट नाही. पण जेव्हा येणारी पिढी विचारणार की पाकिस्तान कुठे होता, त्यावेळीच बदल्याचा खरा आनंद मिळतो, असे ट्विट

संग्रहित छायाचित्र

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत पाकिस्तानविरोधात युद्धाची भूमिका मांडली. हल्ल्याचा निषेध करणे, बदला घेणे ही मोठी गोष्ट नाही. पण जेव्हा येणारी पिढी विचारणार की पाकिस्तान कुठे होता, त्यावेळीच बदल्याचा खरा आनंद मिळतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.

पुलवामा येथे दहशतवाद्याने सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात ४१ जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सोमवारी ट्विट केले. हल्ल्याचा निषेध करणे, बदला घेणे ही मोठी गोष्ट नाही. पण जेव्हा येणारी पिढी विचारणार की पाकिस्तान कुठे होता यात बदल्याचा खरा आनंद मिळेल, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.

दरम्यान, पुलवामावरील हल्ल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पाकिस्तानवर हल्ल्याची मागणी केली होती. या आधी झालेल्या सर्जिकल स्ट्राइकचा अभिमान आहे. मात्र तो सर्जिकल स्ट्राइक आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये केला होता. ती लोकं आपल्या देशात घुसून घातपात घडवत आहे. जनतेच्या मनात संताप असून जनता सरकारच्या पाठिशी आहे, सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून धडा शिकवला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 11:57 am

Web Title: shiv sena leader sanjay raut slams pakistan in tweet after pulwama terror attack
Next Stories
1 अमित शाह आज मुंबईत, उद्धव ठाकरेंची भेट घेणार; युतीवर तोडगा निघणार
2 प्रेमप्रकरणात मध्यस्थी बेतली जिवावर, युवा सेना पदाधिकाऱ्याची हत्या
3 वाढदिवशीच तरुणाची आत्महत्या; संध्याकाळी पार्टी देणार होता, पण…