आठवीच्या पुस्तकात गुजराती भाषेतील धड्यावरुन झालेला वाद ताजा असतानाच महाराष्ट्रातील शिक्षकांना ‘वंदे गुजरात’ या गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याच्या निर्णयावरुन शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे. शिक्षणमंत्री विनोदजी तावडे यांनी भविष्यात महाराष्ट्राचा नावाचा उल्लेख ‘गुजराष्ट्र ‘ म्हणून केला तर आर्श्चर्य वाटणार नाही, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षकांना येत्या २४ ते २६ सप्टेंबर रोजी व्हर्च्युअल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने दूरदर्शनच्या मराठी ‘सह्याद्री’ वाहिनीला डावलून ‘वंदे गुजरात’ या वाहिनीची निवड केली आहे. या अभ्यासक्रमासाठी संबंधित विषय महाराष्ट्रात ही दूरचित्रवाहिनी दिसत नसल्यामुळे त्यासाठी शाळेत ‘डिश सेटटॉप’ बॉक्स बसवावा किंवा ज्यांना हे शक्य नाही त्यांनी ‘जिओ टीव्ही’ अ‍ॅपमधील ‘वंदे गुजरात’ वाहिनी बघावी, असे आदेशात म्हटले आहे. ज्या शाळांमध्ये टीव्ही नाही, अशा शिक्षकांना इतर शाळेत जाऊन प्रशिक्षण घेण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयावरुन शिवसेनेच्या आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी टीका केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mla manisha kayande slams vinod tawde sahyadri vande gujarat channel controversy
First published on: 21-09-2018 at 19:13 IST