News Flash

हाथरस प्रकरणावरून प्रियंका चतुर्वेदींचा कंगनावर निशाणा, म्हणाल्या…

हाथरस प्रकरणावरून साधला निशाणा

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाची देशभरामध्ये चर्चा आहे. या प्रकरणामधील पीडित तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. पीडित तरुणी १४ सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली. चौघांनी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या तरुणीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमधील वातावरण चांगलेच तापले असून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी होत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारवर टीका करणाऱ्या कंगनाला शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी नाव न घेता चांगलंच सुनावलं आहे आणि ती या प्रकरणी गप्प का आहे असा सवालही केला आहे.

“दिवसरात्र मुंबई पोलिसांवर टीका करण्यासाठी जेव्हा व्हाय सुरक्षा देऊन गौरवण्यात आलं, जी महिलांचा आवाज बनून मुख्यमंत्री आणि राज्याच्याबाबतीत आक्षेपार्ह टीका करत होती, माध्यमांची जी लाडकी होती ती आता गप्प का आहे? हाथरस प्रकरणी तिचं कोणतंही ट्वीट का दिसत नाही,” असा सवाल चतुर्वेदी यांनी केला आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटरवरून कंगनाचं नाव न घेता निशाणा साधला.

यापूर्वी हाथरस प्रकरणावरून कंगनानं एक ट्वीट केलं होतं. ३० नोव्हेंबर रोजी तिनं केलेल्या ट्वीटमध्ये आपल्याया योगी सरकारवर भरोस असून पीडितेला न्याय मिळेल असं म्हटलं होतं. दरम्यान, दुसरीकडे या प्रकरणावरून शिवसेनेनंही सामनाच्या संपादकीयमधून टीका केली होती. उत्तर प्रदेशातील अयोध्येत राममंदिराची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली आहे, पण उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ वगैरे नसून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत ‘जंगलराज’ आहे. महिलांवर अत्याचार सुरूच आहेत, पण तरुणींवर बलात्कार आणि खून करण्याच्या घटना योगींच्या राज्यात वाढल्या आहेत. हाथरसमध्ये १९ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार व नंतर खून झाला. त्यानंतर देशात गदारोळ उडाला आहे, असं म्हणत शिवसेनेनं योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 7:17 pm

Web Title: shiv sena mp spokeperson priyanka chaturvedi criticize kangana ranaut hathras gand rape no comment jud 87
Next Stories
1 बिहार निवडणूक : महाआघाडीतील जागा वाटपाचा पेच सुटला; राजद १४४, काँग्रेस ७० जागा लढवणार
2 हाथरस प्रकरण: पीडित कुटुंबाच्या नार्को चाचणीच्या स्थगितीसाठी अलाहाबाद हायकोर्टात याचिका
3 उत्तर प्रदेशच्या अप्पर मुख्य सचिवांनी घेतली ‘त्या’ कुटुंबाची भेट; म्हणाले…
Just Now!
X