15 August 2020

News Flash

एकेकाळची प्रिय मित्र असलेली शिवसेना आता पूर्व मित्र- दानवे

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी शिवसेनेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या

संग्रहीत

जालना : एकेकाळी प्रिय मित्र असलेले आता आपले पूर्व मित्र झाले आहेत, अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी शिवसेनेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. जालना जिल्हा भाजप अध्यक्षपदी आमदार संतोष दानवे यांची निवड झाल्यानंतर पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

रावसाहेब दानवे म्हणाले, यापूर्वी पक्षाने संतोष दानवे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. आता त्यांची आमदार म्हणून नियुक्ती झाली आहे. आपली दोन वेळेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड  झाल्यानंतर पक्षाच्या घटनेनुसार तिसऱ्यांदा अध्यक्षपदी राहता येत नाही. यापूर्वी संतोष दानवे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली याची आपणास पूर्वकल्पना नव्हती. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून संतोष दानवे यांची नियुक्ती केली होती. आता ते आमदार म्हणून निवडून आले आहेत.  येत्या तीन वर्षांत जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि स्थानिक पातळीवरील निवडणुका होणार आहेत. त्यावेळी भाजपच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांची महाआघाडी असेल. परंतु भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत काम करून आपण कमी नाहीत, हे या निवडणुकांत दाखवून द्यावे. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड आदींची भाषणे यावेळी झाली. पक्षाचे मराठवाडा संघटक भाऊराव देशमुख, जालना शहराध्यक्ष राजेश राऊत, भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, माजी शहराध्यक्ष विलास नाईक यांच्यासह बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांची उपस्थिती भाजपच्या या बैठकीस होती.

लोणीकर यांची अनुपस्थिती

भाजपचे परतूरचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची मात्र पक्षाच्या जिल्हाध्यक्ष निवडीसाठी आयोजित बैठकीस अनुपस्थित होते. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य असलेले त्यांचे पुत्र राहुल लोणीकर हेही या बैठकीस गैरहजर होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 6:52 am

Web Title: shiv sena now ex friend raosaheb danve zws 70
Next Stories
1 सहा वर्षांत ५८२ अपघात
2 सीमालगत भागात रस्त्यासाठी परवड
3 ‘कडबा शेती’मुळे शेतकऱ्यांना आर्थिक हातभार
Just Now!
X