22 October 2020

News Flash

शिवसेनेचा मोदी सरकारवर ‘विश्वास’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात वेळोवेळी नाराजी व्यक्त करणारी शिवसेना विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाच्या मतदानाच्या वेळी मोदी सरकारच्या बाजूने उभे राहणार

संग्रहित छायाचित्र

विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावात शिवसेनेने भाजपाची साथ देत ‘मित्र धर्म’ निभावला. शिवसेनेने पक्षाच्या खासदारांना व्हिपही जारी केला असून अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केल्याचे वृत्त आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात वेळोवेळी नाराजी व्यक्त करणारी शिवसेना विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाच्या मतदानाच्या वेळी मोदी सरकारच्या बाजूने उभी राहणार का, याची उत्सुकता निर्माण झाली होती. तेलगू देसम पक्षाने अविश्वास प्रस्तावासाठी पुढाकार घेतला आहे. शिवसेना खासदाराला विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली होती. त्यावेळी तेलगू देसम पक्षाचे खासदार केंद्रीय हवाई नागरी मंत्रीपदी होते. या प्रकरणात तेलगू देसमने शिवसेनेला अपेक्षित साथ दिली नव्हती. यामुळे शिवसेना तेलगू देसमवर नाराज आहे. तसेच भाजपाकडे २७३ चा बहुमताचा आकडा असल्याने शिवसेनेने अविश्वास दर्शक प्रस्तावाविरोधात भाजपाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेकडून खासदारांसाठी व्हिप जारी केल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. गुरुवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. या चर्चेनंतर शिवसेनेने भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अविश्वास ठरावात शिवसेनेने साथ दिल्याने आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षाचे युती होणार, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 2:27 pm

Web Title: shiv sena support modi government during no confidence motion in lok sabha
Next Stories
1 मुख मैथुनासाठी पतीचा दबाव, पत्नीची सुप्रीम कोर्टात धाव
2 भारताच महत्व कमी करण्यासाठी चीनची म्यानमारमध्ये नवी खेळी
3 ‘आम्ही दहशतवाद्यांना टिप देत नाही’, मुस्लिम नाव असल्याने वेटरला टिप देण्यास ग्राहकाचा नकार
Just Now!
X