24 November 2020

News Flash

ठरलं! उद्धव ठाकरे ‘या’ दिवशी जाणार अयोध्येत

त्यांचा संपूर्ण कार्यक्रम ठरला असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या ७ मार्च रोजी अयोध्येत जाणार असल्याची माहिती, शिवसेनेचे नेते खासदार संदय राऊत यांनी दिली. ‘राज्य सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर अयोध्येत जातील, असं यापूर्वी सांगण्यात आलं होतं. परंतु आता ते ७ मार्च रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तसंच त्यांचा संपूर्ण कार्यक्रम ठरला आहे,” असं राऊत म्हणाले.

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार याबाबात घोषणा झाली होती. सरकारला १०० दिवस झाल्यानंतर ते जातील असं म्हटलं होतं. परंतु आता ७ मार्चला ते अयोध्येला जातील. या ठिकाणी ते राम लल्लाचं दर्शन घेतील. तसंच शरयू तीरावर आरतीही करतील,” अशी माहिती राऊत यांनी दिली. यावेळी हजारो शिवसैनिकही अयोध्येत जातील, असंही त्यांनी नमूद केलं. “हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. त्याचं कोणीही राजकारण करू नये. राजकीय दृष्टीनं याकडे पाहू नये,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा – “सत्तेसाठी शिवसेनेने रंग बदलला म्हणणं हे अकलेची दिवाळखोरी निघाल्याचं लक्षण”

“काँग्रेसच्या हंगमी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राममंदिराच्या निकालाचं स्वागत केलं होतं. त्या ठिकाणी राममंदिर उभारलं जावं, अशी त्यांचीही धारणा होती, असं माझ्या वाचनात आणि ऐकीवात आलं होतं. त्यामुळे सल्ले देणाऱ्यांनी आधी माहिती घ्यावी आणि नंतर बोलावं,” असं ते एका विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. यापूर्वी त्यांनी २४ नोव्हेंबर २०१८ रोजी आपल्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौरा केला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारा त्यांचा प्रस्तावित दौरा रद्द करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2020 11:27 am

Web Title: shiv sena uddhav thackeray will go ayodhya ram mandir on 7th march jud 87
Next Stories
1 “सत्तेसाठी शिवसेनेने रंग बदलला म्हणणं हे अकलेची दिवाळखोरी निघाल्याचं लक्षण”
2 भीमा कोरेगाव : केंद्र सरकारकडून कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न: अनिल देशमुख
3 मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसला भीषण अपघात
Just Now!
X