27 November 2020

News Flash

शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार-नारायण राणे

आगामी निवडणुकीत ११ पैकी एकही आमदार निवडून येणार नाही असंही राणेंनी म्हटलं आहे

शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार असल्याची गर्जना भाजपाचे नेते नारायण राणे यांनी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अकरापैकी एकही आमदार निवडून येणार नाही, सगळ्यांन घरी बसवणार असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. आज सिंधुदुर्गात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ५६ आमदार घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या कमी होईल असंही राणेंनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. शिवसेनेचे १४५ आमदार निवडून आलेले नाहीत. त्या बळावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले नाहीत. त्यामुळे ते बाहेर पडले तर तुमचे किती आमदार असा प्रश्न लोक त्यांना विचारतील म्हणून ते पिंजऱ्यातून बाहेरच पडत नाहीत असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

कोकणात असलेले ११ आमदार हे विधानसभेत कोकणच्या विकासाबाबत का बोलत नाहीत? जाहीर केलेला फंडही सरकार देत नाही. कोकणचे पालकमंत्री तर निष्क्रिय आहेत. ते जिल्ह्यात येऊन काय करतात हे पण एक दिवस उघड करेन असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर शिवसेनेचे आमदार विधानसभेत काही बोलले नाहीत तरीही कोकणचा विकास थांबवायचा नाही हे आम्ही ठरवलं आहे. कोकणातील विकासाला चालना मिळालीच पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 6:20 pm

Web Title: shiv sena will be expelled from konkan says narayan rane scj 81
Next Stories
1 मोदी सरकार हळूहळू देशात आणीबाणी आणू पाहतं आहे-सुप्रिया सुळे
2 केंद्राने दिलेल्या २२०० कोटींच्या निधीपैकी महाराष्ट्राला सर्वाधिक ३९६ कोटींचा निधी-फडणवीस
3 निवृत्तीच्या वयात ‘निवृत्ती’ने फुलवला रानमळा
Just Now!
X