03 June 2020

News Flash

सांगलीच्या कन्या महाविद्यालयात मोडी लिपीतून शिवमहिमा!

विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पलूंची माहिती सांगणारे लेख मोडी लिपीतून लिहिले.

गरवारे कन्या महाविद्यालयाच्या विद्याìथनीनी मोडी लिपीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची महती विशद करणारे प्रदर्शित केलेले भित्तिपत्रक.

दिगंबर शिंदे, लोकसत्ता

सांगली : मराठा रियासतीचा इतिहास हा मोडी लिपीबद्ध आहे. हाच धागा पकडून सांगलीच्या गरवारे कन्या महाविद्यालयातील इतिहासाच्या विद्यार्थिनींनी शिवजयंतीचे औचित्य साधून शिवाजी महाराज यांच्या चरित्रातील ठळक घडामोडी मोडी लिपीतून महाविद्यालयाच्या काचफलकात भित्तिपत्रकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याला मोडी लिपीतूनच शिवस्मरण असे नामकरण करीत इतिहासाचा धांडोळा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.

गरवारे महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने मोडी लिपीतील भित्तिपत्रिका करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट भित्तिपत्रिकेच्या माध्यमातून उलगडून दाखविण्यात आला. प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागाच्या प्रा. डॉ. ऊर्मिला क्षीरसागर, मोडी अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.

विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पलूंची माहिती सांगणारे लेख मोडी लिपीतून लिहिले. शिवाजी महाराजांचे शेती विषयक धोरण, आरमार, विविध किल्ले, त्यांचे धार्मिक धोरण अशा विविध विषयांवर मोडी लिपीत लेख लिहून ते आकर्षक रीत्या मांडण्यात आले. या भित्तिपत्रिकेला ‘शिवस्मरण’ असे समर्पक नावही देण्यात आले.

मोडी लिपी शिक्षक मानसिंगराव कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली  विद्यार्थिनींनी हे मोडी लिपीतील लेख लिहिले.

भित्तिपत्रिकेच्या उद्घाटनावेळी विद्यार्थिनींनी मोडी लिपीतून रांगोळी रेखाटली. विद्यार्थिनींनी मोडी लिपीतून केलेलं हे ’शिवस्मरण’ छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना देणारे ठरले.

या भित्तिपत्रकाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, प्रा. डॉ. ऊर्मिला क्षीरसागर, प्रा. आर. जी. देशपांडे, प्रा. डॉ. इसी, प्रा. डॉ. नंदिनी काळे, प्रा. डॉ. अनिल सुगते, प्रा. डॉ. भावना मारू, प्रा. वैशाली जोशी, प्रा. डॉ. संदीप दळवी, प्रा. अमृता ठिगळे, प्रा. मृदुला लेले यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थिनी उपस्थित होते.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 2:20 am

Web Title: shiva mahima from modi script in girls college of sangli zws 70
Next Stories
1 मुंबई हल्ल्याच्या तपासात वैद्यकीय तज्ज्ञांची मदत – उज्ज्वल निकम
2 पाच वर्षीय मुलीवर अत्याचार, खूनप्रकरणी आरोपीस मृत्युदंड
3 पत्नी नांदण्यास येत नसल्याने सासूचा गोळीबार करून खून
Just Now!
X