News Flash

अडीच एकरांवर साकारण्यात आली शिवरायांची महारांगोळी

महारांगोळीची नोंद गिनिज बुकात

शिवजयंती निमित्त लातूरमध्ये अडीच एकर जागेवर रांगोळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे रेखाचित्र साकारण्यात आले आहे. या चित्रासाठी ५० हजार किलो रांगोळीचा उपयोग करण्यात आला आहे. १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान सर्वांना पाहण्यासाठी रांगोळी खुली ठेवण्यात आली आहे. लातूर येथील मंगेश निपाणीकर, दिनेश लोखंडे आणि तेजेश शेरखाने यांच्यासह ५० जणांनी ही रांगोळी साकारली आहे. यासाठी सुमारे ६ दिवस लागले असल्याचीही माहिती समोर आली आहे.

रांगोळी बाबत माहिती देताना, अतिशय दुर्मिळ असे रंग वापरून रांगोळी काढण्यात आल्याचे निपाणीकर यांनी सांगितले. थ्री डी स्वरूपातील ही रांगोळी असून रंगाच्या अनेक छटा त्यात साकारल्या आहेत. जगातील सर्वात मोठी रांगोळी असुन त्याची गिनीज बुक मध्ये नोंद करण्यात आली आहे. शिवाजी महाराज यांचे सिंहासनावर विराजमान झालेले हे छायाचित्र काढण्यात आले आहे. शिवप्रेमीमधून रांगोळीचा खर्च जमा करण्यात आला. लातूरमधील कला शिक्षकांनी देखील रांगोळीच्या रेखाटनात सहभाग घेतला. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं असून ही रांगोळी लातूरची अस्मिता ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2018 3:37 pm

Web Title: shivaji maharajs rangoli was draw on two and half acres field
Next Stories
1 छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमना अटक
2 ‘घराला घरपण’ देणाऱ्या डीएसकेंवर अटकेची कारवाई का झाली?
3 बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना अखेर अटक
Just Now!
X