ठाकरे सरकारकडून २६ जानेवारी रोजी राज्यात शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार तर मुंबईत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचा शुभारंभ झाला. या योजनेअंतर्गत फक्त दहा रुपयांत थाळी मिळणार आहे. पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यात पालकमंत्री आणि स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत शिवभोजन थाळीचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यास गरिबांना दहा रुपयांत जेवण उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आगामी काळात बचतगट, खाणावळी, भोजनालये येथे ही योजना सुरू करण्यात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशी आहे योजना
शिवभोजन थाळीमध्ये दोन चपाती, एक वाटी भाजी, भात, एक वाटी वरण असा मेन्यू असेल. भोजनालय, स्वयंसेवी संस्था यांच्याकडून ही थाळी ५० रुपयांत उपलब्ध होणार आहे. मात्र, लाभार्थ्यांना ती दहा रुपयांत उपलब्ध करून द्यायची आहे. उर्वरित ४० रुपये शासनाकडून भोजनालय किंवा स्वयंसेवी संस्थांना देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात ३५ रुपयांत ही थाळी मिळेल. इथेही लाभार्थ्यांकडून दहा रुपये आणि उर्वरित २५ रुपये शासन देणार आहे.

जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यात कुठे मिळणार शिवभोजन थाळी –

पुणे
महानगरपालिकेतील हॉटेल निशिगंधा
कौटुंबिक न्यायालय
कात्रज कॉर्नर येथील जेएसपीएमचे उपाहारगृह
स्वारगेट एसटी स्थानक
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमधील समाधान गाळा क्र. ११
महात्मा फुले मंडई
हडपसरमधील गाडीतळ येथील शिवसमर्थ भोजनालय

पिंपरी चिंचवड
महापालिकेचे उपाहारगृह
यशवंतराव चव्हाण रुग्णालय
वल्लभनगर बसस्थानक
नवनगर प्राधिकरण येथे शिवभोजन थाळी मिळेल

नाशिक
कृषी उत्पन्न बाजार समिती
जिल्हाधिकारी कार्यालय
नाशिकरोड रेल्वेस्टेशन

सोलापूर
मार्केट यार्ड
मार्कंडये रूग्णालय
अश्विनी रूग्णालय

सांगली
बस स्थानक
शासकीय रूग्णालय
कृषी उत्पन्न बाजार समिती

परभणी
जिल्हा सामान्य रूग्णालय
बस स्थानक नवा मोंढा

हिंगोली
जिल्हा सामान्य रूग्णालय

चंद्रपूर
बस स्टँड परिसर
गंज वॉर्ड भाजीपाला बाजार
जिल्हा सामान्य रूग्णालय

वर्धा
जिल्हा सामान्य रूग्णालय
सत्कार भोजनालय

सिंधुदुर्ग
जयभवानी हॉटेल
जिल्हा मुख्यालय परिसरातील उपहारगृह

वाशिम
कृषी उत्पन्न बाजार समिती
जिल्हा सामान्य रुग्णालय

भंडारा
जिल्हा परिषदेत आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटाचे भोजनालय
महसूल कॅटीन

नागपूर
डागा हॉस्पिटल
गणेशपेठ बसस्थानक
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल
कळमना मार्केट
मातृसेवा संघाजवळ, महाल

अहमदनगर
रेल्वे स्टेशनसमोरील दत्त हॉटेल
माळीवाडा बसस्थान परिसरातील हमाल पंचायत संचलित कष्टाची भाकर केंद्र
तारकपूर बसस्थानकासमोर हॉटेल सुवर्णम प्राईड संचलित अन्नछत्र
जिल्हा रूग्णालयाजळील कृष्णा भोजनालय
मार्केट यार्ड परिसरातील हॉटेल आवळा पॅलेश

कोल्हापूर
सावित्रीबाई फुले हॉस्पिटल रोड वरती रुद्राक्षी स्वयम् महिला बचत गट
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेल शिवाज
ताराबाई रोडवरील महालक्ष्मी भक्तमंडळ
साईक्स एक्स्टेंशनजवळील हॉटेल साईराज

बुलढाणा
बसस्थानक
जिजामाता प्रेक्षागार
कृषी उत्पन्न बाजार समिती

रत्नागिरी
जिल्हा शासकिय रूग्णालय
हॉटेल मंगला
बस स्थानक
रेल्वे स्थानक

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivbhojan thali will gate this place nck
First published on: 27-01-2020 at 14:22 IST