28 February 2021

News Flash

बारामतीत बेरजेचं राजकारण! अजित पवार-शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील भेटीनंतर चर्चेला उधाण

बंद दाराआड झाली चर्चा...

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ही भेट मतदारसंघातील कामासंदर्भात होती असे सांगून या बाबत अधिक बोलण्यास शिवेंद्रसिंहराजे यांनी नकार दिला. शिवेंद्रसिंहराजे यांनी या भेटी संदर्भात अधिक माहिती दिलेली नसली, तरी बारामतीतून बेरजेचं राजकारण सुरु झाल्याची चर्चा आहे.

आज सकाळी अजित पवार यांच्या भेटीसाठी शिवेंद्रसिंहराजे बारामतीतील विद्या प्रतिष्ठान संकुलातील व्हीआयआयटीमध्ये हजर झाले. बंद खोलीमध्ये अजित पवार यांच्याशी त्यांनी पंधरा मिनिटे चर्चा केली. त्या नंतर माध्यमांनी त्यांना गाठले असता त्यांनी फक्त मतदारसंघातील कामासाठी आलो होतो, त्यात वेगळे नव्हते असे सांगून ते तेथून निघून गेले.

अजित पवार यांच्याशी या पूर्वीही शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारसंघातील कामासंदर्भात चर्चा केलेली होती, त्यामुळे आज त्यांच्या भेटीने पुन्हा काही नवीन राजकीय समीकरणे उदयाला येणार की फक्त मतदारसंघातील कामाबाबतच ही भेट होती या बाबत कार्यकर्त्यांतही चर्चा सुरु झाली आहे.

सातारा जिल्हा बँक व सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात ही त्यांची चर्चा असू शकते. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यापूर्वी नुकतीच पुणे-मुंबई येथे अजित पवार यांची भेट घेतली आहे. मागील काही दिवसातील त्यांची ही तिसरी भेट आहे. साताऱ्यातील विकासकामांच्या अनुषंगाने त्यांची वाढती जवळीक हा राजकीय चर्चेचा विषय झाला आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 3:26 pm

Web Title: shivendra raje bhosale meet ncp leader minister ajit pawar in baramati dmp 82
Next Stories
1 आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलंय -शरद पवार
2 मंत्रालयातील धक्कादायक प्रकार! मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर फाईलमध्ये फेरफार; चौकशीचा आदेशच फिरवला
3 ‘विवा’ होम्सच्या मेहुल ठाकूर यांना अटक
Just Now!
X