सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे मराठा तरुणांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढला पाहिजे नाहीतर इतिहासात मराठ्यांचे पानिपत झालं असं बोललं जातं आता आपण एकत्र आलो नाही तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.आज साताऱ्यात मराठा समाजाची गोलमेज परिषद सुरु आहे या परिषदेला संबोधित करताना शिवेंद्रराजेंनी ही भूमिका मांडली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने तातडीने सोडवावा असंही त्यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा तरुण-तरुणींमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे असं सांगत असतानाच राज्य सरकारने एमपीएसीच्या मेगा भरतीसह इतर विषयांमध्ये गडबड करु नये असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा; ‘मातोश्री’वर नेणार मशाल मोर्चा!

मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. त्याची गरज आहे. वेगवेगळे लढण्याची चूक कुणीही करु नये. आपण वेगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे. मराठा समाज कधीही एकत्र येत नाही असं बोललं जातं. मराठा समाजात दुफळी असल्याचंही बोललं जातं. त्यामुळे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- मराठा आरक्षणासाठी सामर्थ्यांनिशी लढा – मुख्यमंत्री

इतिहासात मराठ्यांचं पानिपत झालं असं नेहमी बोललं जातं.. आता आपण एकत्र आलो नाही तर दुसरं सामाजिक पानिपत होईल आणि इतिहास पुन्हा तुम्हाला माफ करणार नाही असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलंय. तसंच आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नात शरद पवारांनीही लक्ष घालावं असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण उपसमिती रद्द करण्याची मागणी केली आहे. या उपसमितीचा काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे ही समिती बरखास्त करा आणि नव्या सदस्यांची नेमणूक करा अशी मागणीही आबा पाटील यांनी केली आहे. तर मराठा आरक्षणाच्या बाबतीत भूमिका घेण्यात हे सरकार चुकलं आहे अशीही टीका त्यांनी केली आहे.