News Flash

शिवजयंती साजरी झालीच पाहिजे पण…. – उदयनराजे

शिवजयंतीला पोवाडे, बाईक रॅली, मिरवणूका यावर राज्य सरकारनं निर्बंध घातले आहेत

(संग्रहित छायाचित्र)

छत्रपती शिवाजी महाराज ही राज्याची नाही तर देशाची अस्मिता आहे, त्यामुळे शिवजयंती साजरी झालीच पाहिजे. पण शिवजयंती साजरी करताना मात्र करोनाची काळजी घेण्यात यावी. ही प्रशासनासोबत आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. करोना प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीला पोवाडे, बाईक रॅली, मिरवणूका यावर राज्य सरकारनं निर्बंध घातले आहेत, यावर साताऱ्यात उदयनराजे पत्रकारांशी बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णायवर आपली भुमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, करोना ही महामारी आहे. त्यामुळे अनेक जवळच्या लोकांना आपल्याला गमवावे लागले आहे. शिवजयंती साजरी झालीच पाहिजे परंतु लोकांची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आज असते, तर त्यांनीही लोकांच्या काळजी घेण्यालाच प्राधान्य दिले असते. त्यांनीही सर्वांना जपण्याची काळजी घेतली असती. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या १९ फेब्रुवारीस साध्यापणाने साजरी करण्यासाठी शिवजयंती मंडळांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासनाने काही निर्बंध देखील घातले आहेत. यामुळे राज्यात शिवप्रेमींमधून संताप होण्याचे काही कारण नाही .

दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (रविवार) कास धरणाच्या भिंतीचे सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर साता-यात विविध विकास कामांचा आढावा घेतला. पत्रकारांनी उदयनराजेंना राज्य शासनाने करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती उत्सवावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात असून हे निर्बंध मागे घेण्यात यावे, अशी मागणी होत असल्याचे सांगितले.

त्यावर उदयनराजे म्हणाले, संकटकाळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेचा जीव धोक्यात घातला असता का असा प्रतिप्रश्न केला. छत्रपती शिवाजी महाराज देशाची अस्मिता, कराेनामुळे अनेकांना जवळचे नातेवाईक गमवावे लागले. सरकारवर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, एकमेकांची काळजी घेण्याची. छत्रपती शिवाजी महाराजांनीही सर्वांना जपण्याची भुमिका बजावली हीच भुमिका आपल्याला बजावावी लागणार आहे. शिवजयंती साजरी झालीच पाहिजे पण काळजी घेऊनच असेही उदयनराजेंनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 2:45 pm

Web Title: shivjayanti 2021 udayanraje talking about shiv jayanti restrictions nck 90
Next Stories
1 “निदान सावरकर परजीवी किंवा आंदोलनजीवी होते असं म्हणू नका”
2 समुद्रात जाणाऱ्या बाजची रेल्वे उड्डाणपुलाला धडक
3 शेतीच्या वादातून भाऊ, जावयाचा खून
Just Now!
X