18 February 2019

News Flash

संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानची नऊ दिवसाची ‘दुर्गामाता दौड’ सुरु

'दुर्गामाता दौड'ला ३५ वर्षाची परंपरा आहे.

शिवप्रतिष्ठानच्यावतीने परंपरेप्रमाणे निघणाऱ्या ‘दुर्गामाता दौड’ला आज १० ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. दौडमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. घटस्थापनेच्या दिवशी सांगली शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या दौडीमध्ये महापौर संगीता खोत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, धारकरी सहभागी झाले होते. आज दौड मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नवरात्रीच्या नऊ दिवस ही दौड शहरातील वेगवेगळ्या मार्गावरून काढली जाते. दसऱ्याच्या दिवशी याची सांगता होते.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजीही या दौडमध्ये सहभागी झाले होते. ‘तुम्ही या दौडच्या बंदोबस्तात असला, तरी डोक्यावर तुमची वर्दीतील टोपी किंवा पांढरी टोपी ठेवा, अशा सूचना यावेळी भिडे गुरूजींनी पोलिसांना दिल्या.

‘दुर्गामाता दौड’ला ३५ वर्षाची परंपरा आहे. तरुणांमध्ये धर्माविषयी जागृती व्हावी यासाठी १९८२ साली संभाजी भिडे यांनी सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडला सुरुवात केली. या दौडनिमित्ताने शहरात नवरात्रोत्सवाची वातावरण निर्मिती केली जाते. मशाल, तलवारधारक, ध्वजधारक अग्रस्थानी असतात. ठिकठिकाणी दौड आणि भगव्या ध्वजाचे औक्षण केले जाते.

First Published on October 10, 2018 1:29 pm

Web Title: shivpratishtan chief sambhaji bhide organize durgamata daud in sangli