संभाजी भिडे गुरूजीप्रणित शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारकऱ्यांची प्रतापगड ते रायरेश्वर ही गडकोट मोहीम शुक्रवारी दुपारपासून सुरू झाली. या गडकोट मोहिमेत सुमारे ५० हजार धारकरी सहभागी झाले आहेत. आज क्षेत्र महाबळेश्वर येथे या मोहिमेचा मुक्काम आहे. गडकोट मोहिमेसाठी निघालेल्या भिडे गुरुजींना यावेळी सातारा पोलिसांकडून विशेष सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राज्यभरातून आलेल्या ५० हजार धारकरी (कार्यकर्ते) शुक्रवारी प्रतापगडावर जमले होते. त्यानंतर दुपारी चार वाजता प्रतापगडावर भवानी मातेची भिडे गुरुजींच्या हस्ते आरती झाली. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई व मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते. याच ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रेरणा मंत्र म्हणण्यात आला. यानंतर प्रतापगड ते रायरेश्वर गडकोट मोहिमेला सुरुवात झाली. प्रतापगड उतरून तार तालुका महाबळेश्वर येथे मोहीमेचा शुक्रवारचा मुक्काम राहिला. यावेळी तेथे पुरंदरचे बाबाराजे जाधवराव (ता. पुरंदर ) उपस्थित होते. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचे व्याख्यान झाले.

Departure of Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony on 29th June
पुणे : ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २९ जूनला प्रस्थान
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
Sri Swami Samarth Maharaj s prakat din Celebrations to Commence in Akkalkot with Religious and Cultural Programs
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रम
Hasan Mushrif
आम्हालाही प्रत्युत्तर द्यावे लागेल – हसन मुश्रीफ यांचा कोल्हापुरातील ‘मविआ’ला इशारा

शनिवारी चार वाजता धारकऱ्यांचा दिवस सुरू झाला. सुरुवातीला बैठका आणि सूर्यनमस्कार हे व्यायाम झाले. त्यानंतर कवी भूषण यांचा छंद आणि प्रेरणामंत्र म्हणण्यात आला आणि झेंडा पुढच्या मुक्कामासाठी रवाना झाला. पार येथील जंगलातून पायवाटेने धारकरी महाबळेश्वरच्या दिशेने रवाना झाले होते. संध्याकाळी हे सर्वजण महाबळेश्वरमध्ये दाखल झाले. याठिकाणी सु.गं. शेवड यांचे व्याख्यान झाले. धारकऱ्यांचा रविवारचा मुक्काम बलकवडी येथील धरणाजवळ असले. तर सोमवारी झेंडा वासोळेमार्गे रायरेश्वरला रवाना होईल. शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी जांभळी पुलावर या गडकोट मोहिमेचा समारोप होईल. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खा.उदयनराजे या समारोपाला उपस्थित राहणार आहेत.