मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या शिवरॅलीच्या स्वागतासाठी शहर परिसरातील मुस्लीम बांधवांनी उत्स्फूर्त पुढाकार घेतला आहे. शिवरॅलीत सहभागी होणाऱ्या हजारो शिवप्रेमी तरुणांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. राज्यात बहुधा प्रथमच एवढय़ा मोठय़ा संख्येने मुस्लीम बांधव शिवरॅलीच्या स्वागतासाठी उत्स्फूर्त एकवटले आहेत.
महोत्सव समितीच्या वतीने बुधवारी काढण्यात येणाऱ्या रॅलीतील सर्व मावळ्यांचे स्वागत करण्याचा निर्णय मुस्लीम समाजातील संस्था, संघटनांनी घेतला आहे. शहरातील सामाजिक सलोखा या माध्यमातून वृद्धिंगत करण्याचा मानस अनेकांनी व्यक्त केला. डॉ. जर्रा काझी यांच्या निवासस्थानी झालेल्या बठकीत हा निर्णय घेण्यात आला. सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेला पूरक कार्यक्रम मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीतर्फे राबविण्यात येत आहेत.
समितीचे अध्यक्ष उमेश राजेिनबाळकर, उपाध्यक्ष राजाभाऊ पवार, कोकाटे सर, मार्गदर्शक अभिषेक बागल, बलराज रणदिवे, मयूर काकडे यांचा मुस्लीम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. रॅलीत सहभागी तरुणांचे स्वागत करण्यासाठी अवेरनेस ग्रुप, बतुलमाल वेल्फेअर सोसायटी, जमात-ए-इस्लामी िहद, जमियत-ए-उलेमा िहद, कैसर खालेद मल्टीपर्पज सोसायटी, एमपीजे उस्मानाबाद, गोलाभाई यंग ग्रुप, स्टुडंट इस्लामिक ऑर्गेनायझेशन, अमन सेवाभावी संस्था, राहत फ्रेंड्स ग्रुप या संस्था, संघटनांनी पुढाकार घेतला आहे. शिवरॅलीस सकाळी साडेनऊ वाजता तुळजाभवानी क्रीडा संकुलातून प्रारंभ होणार आहे.