News Flash

शिवसैनिकांच्या हत्येचं सत्र सुरुच, अहमदनगरनंतर आता भिवंडीत शिवसैनिकाची निर्घृण हत्या

अहमनगरमधील दोन शिवसैनिकांच्या हत्येची घटना ताजी असतानाच भिवंडीत एका शिवसैनिकाची हत्या करण्यात आली आहे

भिवंडीत एका शिवसैनिकाची हत्या करण्यात आली आहे. अहमनगरमधील दोन शिवसैनिकांच्या हत्येची घटना ताजी असतानाच ही हत्या झाली आहे. शैलेश निमसे असं हत्या झालेल्या शिवसैनिकाचं नाव आहे. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नसून, पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, निमसे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

भिवंडी तालुक्यातील दिघाशी जवळील देवचोळा येथे शैलेश निमसे यांची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर ओळख लपवण्याच्या हेतूने त्यांचा मृतदेह पेटवण्यात आला होता. शैलेश निमसे हे शहापूरचे शिवसेना तालुका उपप्रमुख होते. पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला असून, यामागे कोणतं राजकीय कारण आहे की वैयक्तिक याची चाचपणी केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 6:20 pm

Web Title: shivsena activist killed in bhiwandi
Next Stories
1 २६ गावांचा ‘बुलेट ट्रेन’ला विरोध
2 नऊ लाख मतदार अपात्र?
3 रुग्णालय हस्तांतर रखडणार
Just Now!
X