News Flash

जळगावमध्ये शिवसैनिकांनी अडवला फडणवीसांचा ताफा; जाब विचारत केली घोषणाबाजी

जळगाव दौऱ्यात फडणवीसांच्या ताफ्यासमोर शिवसैनिकांचा आक्रोश

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर असून यावेळी शिवसैनिकांकडून त्यांचा ताफा अडवण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने थैमान घातलं होतं. यात केळी बागांसह घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी शिवसैनिकांनी फडणवीसांचा ताफा अडवला.

देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

परिवर्तन चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ताफा अडवत शेतकऱ्यांच्या केळी पीक विमाबाबत जाब विचारला. एकनाथ खडसे अनेक वर्ष भाजपाचे आमदार असतानाही कोणती विकासकामं केली नसल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. फडणवीसांसोबत यावेळी गिरीश महाजनदेखील उपस्थित होते.

वादळी वाऱ्यामुळे १८० घरं पडलेल्या मोदाळदे गावाची केली पाहणी
गेल्या आठवड्यात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील मोदाळदे गावातील १८० घरं पडली आहेत. त्यामुळे सध्या गावातील नागरिक बेघर झाले आहेत. फडणवीसांना बेघर झालेल्या नागरिकांची भेट घेत शासनाकडून भरीव मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.

खडसेंच्या घरी सदिच्छा भेट
फडणवीसांनी मुक्ताईनगरमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात करताना सर्वांना आश्चर्याचा धक्का देत भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली. एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे जळगाव दौऱ्यात फडणवीस एकनाथ खडसेंच्या घऱी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट देत एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 2:00 pm

Web Title: shivsena activist stops bjp devendra fadanvis convoy in jalgaon sgy 87
Next Stories
1 पदोन्नती आरक्षण रद्द : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर नितीन राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
2 पालकांनो, मुलांना जपा! अहमदनगरमध्ये नऊ हजारांहून अधिक अल्पवयीन मुलांना करोनाची लागण
3 “…पुढील १०० वर्ष महाराष्ट्रात विरोधी पक्षाची सत्ता येणार नाही”; फडणवीस-पवार भेटीवरुन संजय राऊतांचा टोला
Just Now!
X