शिवसेना आमदार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव अनेकदा अभिनेत्री दिशा पटानीसोबत जोडलं गेलं आहे. दोघंही चांगले मित्र आहेत. तसंच अनकेदा एकमेकांना भेटले असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अहमदनगरमधील आयोजित कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे दिशा पटानीसंबंधी प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी तुमची दिशा चुकली आहे असं मिश्कील उत्तर दिलं.

अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना लग्नाचा प्रश्न विचारत पाय खेचण्याचा प्रयत्न केला. रश्मी वहिनींनी किती वर्ष जबाबदारी घ्यायची ? असं विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी आमदार म्हणून माझी जबाबदारी आईंने मुख्यमंत्र्यांवर सोपवली आहे असं उत्तर दिलं. यावर अवधून गुप्ते यांनी पण आम्हाला बातम्यांमध्ये काहीतरी दिसत असतं…आपका उत्तर हमको पटनी चाहिये ? म्हणत अप्रत्यक्षपणे दिशा पटानीचा उल्लेख केला.

यावर आदित्य ठाकरे यांनी तुमची दिशा चुकली आहे असं मिश्कील उत्तर दिलं. “आईने आधीच जबाबदारी सोडली आहे. आई मला नेहमी राजकारणात जाऊ नको असं सांगायची. तुझे वडील, आजोबा राजकारणात आहेत. जसं पेपरमध्ये चांगलंही लिहिलं जातं तसं वाईटही. तिने मला आमदार होण्याआधी विचारलं का ? मी लढू शकतो असं विचारलं का ? असंही विचारलं होतं. त्यामुळे पुढचं काही ठरलं नसून आई सगळं ठरवणार आहे.” असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. यावर धीरज देशमुख यांनी आपण ते एलिजेबल आणि अॅव्हेलेबल असल्याचं सांगत आहोत असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

म्हणून शपथविधीच्या वेळी आईचा उल्लेख
“मी इतका विचार केला नव्हता. ते सहजपणे आमच्या तोंडून येऊन गेलं. तो माझ्या आयुष्यातील मोठा क्षण होता. कोणाचं नाव घ्यायचं म्हटलं तर आपण अनेकांचं नाव घेऊन स्मरण करतो. पण हे सगळं करताना आपल्याला ज्यांनी मोठं केलं, इतकं काही शिकवलेलं असतं, हे प्रेम जे तुम्हाला घडवतं त्याचा कुठेतरी उल्लेख झाला पाहिजे आणि म्हणून मी आईचं नाव घेतलं. पण फक्त मी नाही तर सगळ्यांनीच आईचं नाव घेतलं. ही आमच्या पिढीची खासियत असेल,” असं उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं..

संगमनेर येथे आयोजित मेधा महोत्सवात तरुण आमदारांशी संवाद साधण्यात आला. दिग्दर्शक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी ही मुलाखत घेतली. धीरज देशमुख, आदिती तटकरे, आदित्य ठाकरे, रोहीत पवार, झिशान सिद्दीकी, ऋतुराज पाटील हे सर्व तरुण आमदार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी सर्व आमदारांनी दिलखुलास चर्चा करत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.