24 October 2020

News Flash

राज ठाकरे काकांकडून काय शिकायला मिळालं ? आदित्य ठाकरेंचं सूचक उत्तर

आदित्य ठाकरे यांच्या उत्तराला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली

नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न घेऊन शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सध्या राज्यभर ‘जनआशीर्वाद’ यात्रेवर आहेत. विविध शहरांमध्ये ते सभा घेत आहेत, त्यांच्या सभेला तरुणांचा चांगला मिळताना दिसत आहे. अहमदनगर येथेही आदित्य ठाकरेंनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे यांना वेगवेगळे प्रश्न विचारत त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका विद्यार्थ्यांना आदित्य ठाकरे यांना तुम्ही काका राज ठाकरे यांच्याकडून राजकारणातील कोणता धडा घेतलात ? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर आदित्य ठाकरे काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आदित्य ठाकरे यांनीदेखील या प्रश्नावर थेट उत्तर देत आपण आजोबा आणि वडिलांकडूनच राजकारणाचे धडे घेतलं असल्याचं सांगितलं.

आदित्य ठाकरेंच्या सभेत पाकिटमारांचा सुळसुळाट, नेत्याचं पाकिट चोरणाऱ्याला शिवसैनिकांनी बदडलं

ही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताना सांगितलं की, “आपण वडील आणि आजोबांकडून राजकारणाचे धडे घेतले आहेत. आजोबांनी मला एकदा एखादं काम करण्याचा निश्चय केला तर मागे फिरायचे नाही अशी शिकवण दिली. तर वडिलांनी नेहमीच काम प्रामाणिकपणे करण्याचा तसंच खोटं बोलणं, नाटकं करु नये अशी शिकवण दिली”. आदित्य ठाकरे यांच्या या उत्तराला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 11:26 am

Web Title: shivsena aditya thackeray jan ashirward yatra on mns president raj thackeray sgy 87
Next Stories
1 नागपुरात औषध व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या
2 मजुरीच्या पैशातील १०१ रुपये मनिऑर्डर करून मुख्यमंत्र्यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
3 लातूरमध्ये फेसबुकवर पोस्ट टाकल्यावरून तरूणाचा खून
Just Now!
X